कोरोनाने मृत्यू झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये भरपाई द्या
By सुमेध वाघमार | Published: December 7, 2023 07:12 PM2023-12-07T19:12:55+5:302023-12-07T19:13:16+5:30
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस : विधीमंडळावर पहिल्याच दिवशी तीन मोर्चांची धडक
सुमेध वाघमारे, नागपूर : विधीमंडळावर गुरुवारी पहिल्याच दिवशी तीन मोर्चांनी धडक दिली. कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या मनपा कर्मचाºयांना ५० लाख रुपये सानुग्रह भरपाई देण्याचा मुख्य मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने शेकडो कर्मचाºयांसह मोर्चा काढत लक्ष वेधले. बीड वरून आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच व नागपूरच्या समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटनेनेही आपल्या मागण्या रेटून धरल्या.
५४ कर्मचाºयांपैकी दोंघानाच मिळाले अनुदान कोरोना विरूद्ध लढ्यात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची योजना शासनाने जाहिर केली होती. नागपुरात कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या मनपाच्या ५४ कर्मचाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु आतापर्यंत दोनच कर्मचाºयांना सानुग्रह सहाय्य मिळाले आहे. इतरांनाही तातडीने देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने विधीमंडळार हल्लाबोल मोर्चा काढला.
धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मार्चाचे नेतृत्व बंटी शेळके व गोविंदभाई परमार यांनी केले. ‘सफाई कामगार एकता जिंदाबाद’चे नारे देत निघालेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेत एक कर्मचारी सहभागी झाला होता. मोर्चात बहुसंख्य कर्मचारी हातात खराटा घेवून होते. चौका-चौकात सफाई करून नारेही देत होते. मॉरीस कॉलेज टी पॉर्इंट चौकात मोर्चाला अडविण्यात आले. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.
या आहेत मागण्या
: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य देणे
: लाड समिती शासन निर्णयानुसार ३० दिवसांत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे
: मृत कर्मचाºयांच्या कुटुंबाला जुनी पेन्शन लागू करणे
: सर्व एवजदार कर्मचाºयांना स्थायी करणे
: शिक्षीत कर्मचाºयांची खुल्या वर्गात पदोन्नती देणे
: श्रम साफल्य आवास योजनांतर्गत सफाई कर्मचाºयांना घर देणे, यासह इतरही मागण्या होत्या.