माओवादी साईबाबाला उपचारासाठी जामीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:49 PM2019-01-24T22:49:22+5:302019-01-24T22:50:19+5:30
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा विनंतीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा विनंतीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.
अर्जावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने सद्यपरिस्थितीच्या आधारावर साईबाबाला जामीन मंजूर करण्यास नकार देऊन, साईबाबाचे वकील मिहीर देसाई यांना मूळ प्रकरणावर अंतिम युक्तिवाद करण्यास सांगितले. त्यासाठी देसाई यांनी वेळ मागितल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर ११ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच साईबाबाची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये साईबाबाला १९ प्रकारचे आजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सरकारतर्फे अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.