अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र द्या; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:48 AM2020-10-19T10:48:58+5:302020-10-19T10:49:31+5:30

High court Nagpur News अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार आवश्यक लाभ मिळावे याकरिता गोंदिया येथील विद्या खोबरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

Give the mother's caste certificate to the offspring; Petition in the High Court | अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र द्या; हायकोर्टात याचिका

अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र द्या; हायकोर्टात याचिका

googlenewsNext
ठळक मुद्देकायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार आवश्यक लाभ मिळावे याकरिता जात प्रमाणपत्र कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी या विनंतीसह गोंदिया येथील विद्या खोबरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने नुपुर भागवत, माधवी रामटेके व आंचल बडवाईक यांच्या प्रकरणामध्ये आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सरकारने त्यातून काहीच धडा घेतला नाही. आजही अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारले जात आहे. त्यामुळे पतीपासून विभक्त झालेल्या महिलांना व त्यांच्या अपत्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता जात प्रमाणपत्र कायद्यात तातडीने दुरुस्ती करून अपत्यांना आईच्या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद लागू करणे आवश्यक आहे असे खोबरेकर यांनी याचिकेत नमूद केले आहे.

२०१८ पासून लढा
मुलगा मानस याला स्वत:च्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे याकरिता खोबरेकर २०१८ पासून लढा देत आहेत. परंतु, उप-विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना अद्याप संबंधित जात प्रमाणपत्र दिले नाही. विविध नियम सांगून त्यांना टाळण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खोबरेकर घटस्फोटित महिला आहेत. त्या मानसचा तो दोन वषार्चा असताना एकट्याने सांभाळ करीत आहेत.

सरकारला हायकोर्टाची नोटीस
न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या याचिकेवर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, नागपूर येथील मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात मानसचा प्रवेश झाला असल्यास त्यास बाधा निर्माण करण्यास मनाई केली.

Web Title: Give the mother's caste certificate to the offspring; Petition in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.