लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांची भेट घेतली. जगात शांततेचा पुरस्कार बौद्ध धम्माला देण्यात आला आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय प्लॅटफार्म तिकिटाचे दर आणि तिकीट रद्द करताना कपात होणारी रक्कम कमी करावी, रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवि शेंडे, उपाध्यक्ष मिलिंद मेश्राम, सल्लागार चंद्रकांत दहिवले, आनंद चौरे, महिला आघाडी अध्यक्ष वनमाला उके, अरुण फुलझेले, प्रशांत नारनवरे, विशाल वानखेडे, नालंदा गणवीर, नंदिनी सोनी, चारुशीला गोस्वामी, माया शेंडे, रवि वंजारी, कमलेश शंभरकर, आनंद बागडे, गोवर्धन भेले, विशाल शेंडे, देवेद्र डोंगरे, विनोद मोहोड, मनोज भगत, भीमराव दुपारे यांचा समावेश होता.
नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 9:41 PM
नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघाची मागणी : ‘डीआरएम’ला निवेदन सादर