लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना कामातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ३०० रुपये रोजी द्यावी, सुरक्षेची साधने उपलब्ध करावी यासह अन्य मागण्यांसंदभांत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटीयूच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जाशी यांच्याशी शनिवारी चर्चा केली.आशा वर्करना कोरोना सर्व्हेच्या कामासाठी महिन्याला अतिरिक्त १ हजार रुपये देण्यात येतील. सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध केली जातील. त्यांना बाधा झाल्यास उपचाराची सुविधा उपलबध केल्या जातील. तक्रार निवारण समिती गठित करून आशा वर्करच्या समस्या सोडविण्याची ग्वाही राम जोशी यांनी दिली.यावेळी जोशी यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, शहर समन्वयक रेखा निखाडे उपस्थित होते. विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी ५ आॅक्टोबरला संविधान चौकात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. सीआयटीयूतर्फे युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, दिलीप देशपांडे, महासचिव प्रीती मेश्राम, सचिव रंजना पौनिकर, कांचन बोरकर, पिंकी सवाईथूल, रुपलता बोंबले, पौर्णिमा पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याआशा वर्करना कोरोना कामाची ३०० रुपये रोजी द्यावी.सर्व्हे करताना मुबलक सुरक्षा साहित्य उपलब्ध करावे.कोरोनाबाधित आशा किंवा गट प्रवर्तक यांची मानधन कपात थांबवा.आशा व गटप्रवर्तक यांची प्रताडना थांबवासर्व्हे करताना आरोग्य कर्मचारी सोबत द्यावे.
आशा वर्करना ३०० रुपये रोजी द्या : संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:36 AM
Asha Workers कोरोना कामातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ३०० रुपये रोजी द्यावी, सुरक्षेची साधने उपलब्ध करावी यासह अन्य मागण्यांसंदभांत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटीयूच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जाशी यांच्याशी शनिवारी चर्चा केली.
ठळक मुद्देमनपा अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा