शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 8:18 PM

मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १४ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान झाले. परिणामी, ५१ रुग्णांना जीवनदान तर २२ व्यक्तींना बुबूळ मिळाल्याने त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला आहे.

ठळक मुद्दे२२ जणांना मिळाली दृष्टी : १४ ब्रेन डेड व्यक्तींकडून अवयवदान

आॅनलाईन लोकमतनागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १४ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान झाले. परिणामी, ५१ रुग्णांना जीवनदान तर २२ व्यक्तींना बुबूळ मिळाल्याने त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला आहे.माणसाला मेल्यानंतर देखील जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयव दान. अवयव दानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. सरकार, स्वयंसेवी संस्थांकडून या जागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत असल्याने आताशा थोडेफार लोक अवयव दानासाठी पुढे येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदानाचा टक्क्यात आणखी वाढ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनीची (मूत्रपिंड) गरज भासते. परंतु प्रत्यक्षात पाच ते सहा हजार किडनी उपलब्ध होतात. दरवर्षी ५० हजार लिव्हरची (यकृत) गरज भासते त्या तुलनेत ७५० लिव्हर प्रत्यारोपण होतात. नेत्रदानातही आपण मागे आहोत.

एका ब्रेनडेड व्यक्तीकडून १० अवयवांचे दान‘ब्रेनडेड’ घोषित करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सहा तासांत दोन वेळा रुग्णांची तपासणी करते. मगच रुग्ण ब्रेनडेड झाल्याचे नातेवाईकांना सांगितले जाते. ‘ब्रेनडेड’ रुग्ण म्हणजे मेंदू मृत होतो पण इतर अवयवांचे कार्य सुरूच असते. अशा व्यक्तींकडून मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, व त्वचा दान करता येऊ शकते. एक ब्रेनडेड व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकते.२०१३ मध्ये एका ब्रेनडेड व्यक्तीपासून झाली सुरूवातअवयवदाता व गरजू रुग्णांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य विभागीय प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) करते. नागपुरात ही समिती २०१२ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून अवयवदानाची चळवळ जोर धरू लागली. २०१३ मध्ये पहिल्या ब्रेनडेड व्यक्तीकडून दोन्ही किडनी दान करण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये तीन ब्रेनडेड व्यक्तीकडून पाच किडनी, २०१५ मध्ये चार ब्रेनडेड व्यक्तींकडून सात किडनी, २०१६ मध्ये सहा ब्रेनडेड व्यक्तींकडून १२ किडनी, एक यकृत व त्वचा दान करण्यात आले तर २०१७ मध्ये १४ व्यक्तींकडून २४ किडनी, १२ यकृत, ५ हृदय व २२ बुबुळ व त्वचा दान करण्यात आले. अवयवदानाचा हा आकडा वाढविण्यास ‘झेडटीसीसी’ कार्य मोलाचे ठरले. या समितीचे अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे हे आहेत. या समितीकडून अवयवदानाप्रति होत असलेली जनजागृती व वेळीच निर्णय घेत असल्याने हा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे.एक आशादायी चित्रअवयवदानाच्या जनजागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाल्याने हा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे, २०१३ ते २०१७ या वर्षांत ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडा दुपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी सहा-सात ब्रेनडेड व्यक्तींच्या नातेवाईकांनीच अवयवदानासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे. अयवदानाची ही चळवळ आता घराघरात पोहचणे आवश्यक आहे.-डॉ. रवी वानखेडेसचिव, झेडटीसीसी

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर