शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

२०२० पर्यंत नागपूर होणार ग्लोबल सिटी

By admin | Published: December 28, 2014 12:38 AM

नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल

नागपुरातील एनआरआय समूहाचा पुढाकार : नागपूर फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्टनागपूर : नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केल्याची माहिती समूहाचे प्रमुख शिकागो येथील अनिवासी भारतीय दिनेश जैन यांनी दिली.नागपूर फर्स्ट आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मंचावर खासदार अजय संचेती, आ. आशिष देशमुख, आ. सुनील केदार होते. जैन यांनी सांगितले की, १९८४ मध्ये नागपूर सोडले. या शहराशी आपली बांधिलकी आहे. मातीचे कर्ज चुकविण्याची कल्पना २००६ मध्ये मनात आली. विविध देशातील अनिवासी भारतीयांशी चर्चा केल्यानंतर २००८ मध्ये नागपूरला ग्लोबल सिटी बनविण्याची संकल्पना पुढे आली. विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविताना नागपूर फर्स्टने ५ हजार झाडे लावली आहेत. शिवाय अनेक कामे तडीस नेली आहेत. ग्लोबल समिट दरवर्षी भरविण्यात येणार आहे. नागपूर फर्स्टला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केदार आणि संचेती यांनी दिले. उद्घाटन सत्राचे संचालन संजय अरोरा यांनी केले. शशांक राव, फैज वाहिद आणि निशांत सोमलवार यांनी पाहुण्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. उद्घाटन सत्रानंतर ‘ग्लोबल शहरासाठी ग्लोबल स्टॅन्डर्ड’ यावर चर्चा झाली. यावेळी एनआरआय, व्यावसायिक, उद्योजक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी : गडकरीनागपुरात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टायगर प्रकल्प आहेत. जैविक इंधन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. टाकाऊ भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या जैविक इंधनाचे डिझेलमध्ये मिश्रण केल्यास डिझेलचा दर प्रति लिटर १० रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होऊन रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. भारत १०० दशलक्ष डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि एक लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. अनिवासी भारतीयांनी या दोन्ही क्षेत्रात उत्पादन प्रकल्प नागपुरात सुरू करावेत. विदर्भात पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचे गडकरी म्हणाले. वैदर्भीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी मिहान-सेझमध्ये विविध उद्योग सुरू करावे, नागपूरला जैविक फार्मिंग कॅपिटल बनवावे, कॉटन आणि सिल्क टेक्सटाईल इंडस्ट्री, मायनिंग आणि मिनरल ट्रेडिंग, लॉजिस्टिक सेंटर सुरू करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.