लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ‘यंगिस्तान’ साठी तर तो विशेष संशोधनाचाच विषय. अभ्यासालादेखील देणार नाही इतका वेळ या संशोधनासाठी देण्यात येतो. ‘हे घेऊ की ते’, ‘तिला काय वाटेल’, ‘इट मस्ट बी युनिक’ अशा प्रकारचे विचार काही आठवड्यांपासून मनात घोळत असतात. मग काय तर याकरिता महाविद्यालये, शिकवणी वर्ग, रेस्टॉरंटस् इत्यादी ठिकाणी प्रेमवीरांच्या विशेष ‘राऊंड-टेबल कॉन्फरन्स’देखील होतात. बरे फेसबुक अन् ‘स्काईप’वरदेखील याचीच चर्चा. असा हा गिफ्टस्चा महिमा.यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’साठी नेहमीप्रमाणेच तरुणाई सज्ज झाली आहे. आता ‘गिफ्टस्’ द्यायची वेळ आली म्हणजे थोडे ‘टेन्शन’ तर येणारच. पण चलता है यार! बरे गिफ्ट घेताना खिशाकडेही लक्ष ठेवावे लागते. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर हा ‘मोठ्ठा’ प्रश्न निर्माण होतोच आणि त्यातून निरनिराळे मार्गदेखील काढले जातात. ‘गिफ्ट’ कुठलेही असो पण प्रत्येकाचा उद्देश एकच असतो, ‘समोरच्या व्यक्तीच्या चेहºयावर हास्य आणि मनातील प्रेमाच्या तारांना साद घालणे’. जागतिकीकरणामुळे जवळ आलेल्या जगात मागील वर्षी जो भेटवस्तूंचा ‘ट्रेंड’ होता तो यंदा असेलच असे नाही. बाजारात गेल्यानंतर ‘कुछ ट्रेंडी, कुछ फन्की’ अशा अनेक भेटवस्तू दिसून येतील. अनेक भेटवस्तू तर खरोखरच प्रेमात पडाव्यात अशाच आहेत.सबकुछ ‘रेड अॅन्ड पिंक’बाजारात गेल्यानंतर हमखास तरुणाईचे अड्डे असणाऱ्या दुकानांमध्ये लाल आणि गुलाबी रंगांची उधळण होताना दिसते आहे. फूल असो, गिफ्ट असो, टेडीबिअर असो किंवा पेन. इतकेच काय पण ‘गिफ्ट पॅकिंग’ पेपरदेखील याच रंगांमध्ये दिसून येत आहे. शेवटी प्रेमाच्या रंगातील भेटवस्तूच प्रेम करणाऱ्यांच्या मनाला जास्त भावतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.‘टी-शर्ट’वरच प्रेमाचा संदेशआवडत्या व्यक्तीचा फोटो एखाद्या सुंदर व आकर्षक फ्रेमसोबत भेट देण्याचा ‘ट्रेन्ड’देखील दिसून येत आहे. अगदी १०० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत निरनिराळ्या आकाराच्या फ्रेम्स उपलब्ध आहेत. याशिवाय फोटोचे पझल्स, कप व पेपरवेटवरील फोटोचे प्रिंटिंग इत्यादी भेटवस्तूंचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. टी-शर्टस् किंवा रुमालावरदेखील प्रेमाचा संदेश तसेच फोटो प्रिंट करण्याची सोय उपलब्ध असल्याने अनेकांनी तो पर्यायदेखील स्वीकारला आहे. गोकुळपेठ, सीताबर्डी, सदर येथील दुकानांमध्ये याकरिता गेल्या दोन आठवड्यांपासून तरुणांची गर्दी दिसून येत आहे. शिवाय अनेक ‘आॅनलाईन’ संकेतस्थळांनीदेखील ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.‘चॉकलेट’ तो मांगता ही है...‘व्हॅलेंटाईन’च्या आठवड्यात तरुणाईने ‘चॉकलेट डे’ साजरा केला असला तरी प्रेमाची भेट देताना चॉकलेटलादेखील मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात येत आहे. हार्टच्या आकाराची चॉकलेटस्, विदेशातून आयात करण्यात आलेल्या ‘टॉफीज्’ यांना मोठी मागणी आहे. अनेकांनी तर विशेष आॅर्डर्स देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाची चॉकलेटस् बनवून घेतली आहेत.पूर्वसंध्येला बाजारात उत्साहआपल्या प्रियजनांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देण्यासाठी शहरातील निरनिराळे मॉल्स व गिफ्ट शॉप्समध्ये गर्दी दिसून आली. ग्रीटिंग कार्ड, टेडिबिअर, आकर्षक ज्वेलरी, डिझानयर वॉच, संगीतमय थ्रीडी बुकलेटस्, लव्ह मीटर, हार्टच्या आकाराचे कुशन्स इत्यादी प्रकारच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देण्याकडे कल दिसून येत आहे.‘रेड रोझ’ प्रेमवीरांसाठी ‘एव्हरग्रीन’‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रियकराने प्रेयसीला कुठलेही ‘गिफ्ट’ दिले तरी शेवटी प्रत्येक जण ‘रेड रोझ’ सोबत देतोच. प्रेमाचे प्रतीक असलेले टवटवीत असे गुलाबाचे फूल पाहून प्रेयसीच्या गालावरदेखील नकळतपणे गुलाबी छटा उमटते आणि दोघांचेही ‘दिल गार्डन गार्डन’ होते. बाजारातील फुलमार्केटमध्ये बाहेरून मागविण्यात आलेल्या गुलाबांना मोठी मागणी असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली आहे. चौकाचौकात गुलाबाच्या फुलांनी व पुष्पगुच्छांनी दुकाने सजलेली आहेत. शुक्रवारी फुलांचे दर महाग होतील या शक्यतेने अनेक प्रेमवीरांनी गुरुवारीच ‘रेड रोझ’ खरेदी केले, हे विशेष.विवाहित ‘कपल्स’साठी टिप्स
- जर विवाहित असाल तर जोडीदाराला सकाळी उठल्यावर लगेच छानसे टवटवीत गुलाबाचे फूल व भेटवस्तू द्या.
- शक्य असेल तर सुंदर असे ग्रीटिंग कार्ड द्या.
- एकमेकांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
- पत्नीला सकाळी बिछान्यावरच गरमागरम कॉफी देऊन आश्चर्याचा धक्का द्या.
- संध्याकाळी जोडीदारासोबत मस्त फिरायला जा.
- जोडीदाराला आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा.
- एखादे छानसे ‘सरप्राईज’ देण्याचा प्रयत्न करा.
- एखादी प्रेमळ कविता किंवा ‘लव्ह लेटर’ देऊन मनातील भावना व्यक्त करा.
- एखादा रोमॅन्टिक सिनेमा किंवा नाटकाला जा.