जी.एन. साईबाबाला उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:34 AM2020-05-22T10:34:22+5:302020-05-22T10:34:46+5:30
देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दिल्लीतील प्रो. जी.एन. साईबाबा याला नागपूर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दिल्लीतील प्रो. जी.एन. साईबाबा याला नागपूर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला आहे. साईबाबाची आई कॅन्सरने आजारी आहे. त्यामुळे आईला भेटण्यासाठी त्याने पॅरोल मागितला होता. मात्र हैदराबादच्या ज्या परिसरात साईबाबा जाणार होता तो कोरोना प्रतिबंधित म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे हा पॅरोल नाकारला गेला. लॉकडाऊननंतर जर हा परिसर प्रतिबंधित राहिला नाही तर साईबाबाला नव्याने पॅरोल मागण्याची अनुमती न्यायालयाने दिली आहे.