शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

नागपुरात गो एअरची दोन उड्डाणे अचानक रद्द :  आमदारांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:18 PM

गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीत आयोजित हिवाळी अधिवेशनाचा समारोप शनिवारी झाल्यानंतर मुंबईला परत जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या काही आमदारांना समस्यांचा सामना करावा लागला. गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुंबई विमानासाठी पोहोचलेल्या काही आमदारांची गो एअरचे जी८-२६०२ नागपूर-मुंबई विमान रद्द झाल्याचे कळताच निराशा झाली. त्यांना एअरलाईन्सने तिकिटाचे पैसे परत केले आणि दुसऱ्या एअरलाईन्सच्या विमानात सीट उपलब्ध करून दिली. एअरलाईन्सने उड्डाण रद्द झाल्याचे कारण ऑपरेशनल असल्याचे सांगितले आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या वैमानिकाने ‘सिक’ रिपोर्ट अर्थात आजारी असल्याची तक्रार केली होती. गो एअरची रात्री ८.३० चे जी८- २५१९ दिल्ली-नागपूर विमान पोहोचले नाही. या कारणामुळे जी८-२५२० विमान नागपुरातून दिल्लीला रवाना झाले नाही.

टॅग्स :GoAirगो-एअरMLAआमदारDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर