एमक्युअरचे संचालक तेलंग व गुर्जर यांचे प्रतिपादन उदय अंधारे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गिरीश तेलंग आणि मुकुंद गुर्जर हे पुण्यातील एमक्युअर फार्मा कंपनीचे संचालक आहेत. दोघेही एकत्रितपणे कॅन्सरच्या रुग्णांसाठी पृथ्वीवर नंदनवन निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. या दोघांनी फार्मा संशोधन क्षेत्रात काम केले आहे. त्यापैकी एक व्यवसायाने डॉक्टर आहे आणि दुसरा एक केमिस्ट आहे. दोघांनीही सामाजिक नैतिक मूल्यांची जोपासना करीत कर्करोग आजारावर अद्भूत औषधे अत्यंत अनुदानित किमतीत आणली आहेत. गिरीश लक्ष्मीकांत तेलंग यांनी फार्मास्युटिकल फिजिशियन म्हणून विशेष प्रशिक्षण घेतले आहे. भारतीय नौदलात त्यांची उत्कृष्ट कारकीर्द राहिली आहे. एमक्युअरमध्ये सामील होण्यापूर्वी ते ‘रोचे’चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ‘रोचे’च्या प्रवासादरम्यान कर्करोग उपचारामध्ये उपयोगी संबंधित रेणू विकासात त्यांचा सहभाग होता. सर्वाधिक आयात शुल्कामुळे भारतातील जनता ही महागडी औषधे विकत घेऊ शकत नाही, हे त्यांना दिसून आले. हे रेणू किफायत दरात दाखल करून गरिबांचा दर्जा सुधारण्यासाठी गेल्या दशकात कठोर परिश्रम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाल्यानंतर कंपनीने ट्रायओयुल्फान सारखे रेणू बनविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे कर्करोगाच्या औषधांचे भाव ५० टक्क्यांनी घसरले. लोकमतशी बोलताना गिरीश तेलंग म्हणाले, एमक्युअरला दुर्मिळ औषधांच्या निर्मितीचे जनक मानले जाते. कारण एका विचारपूर्वक प्रयत्नाने या औषधांच्या संश्लेषणचे एक धोरण विकसित केले होते. तीन वर्षांमध्ये या औषधाचे संश्लेषण करण्याची आवड होती, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या कंपनी एक्यूट लिम्फेटिक ल्युकोमियाच्या उपचारासाठी औषध तयार करीत आहे. कंपनीला बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी ट्रायोसल्फान औषधीला मंजुरी मिळाली आहे. कंपनीने रक्ताच्या कर्करोगासाठी पीईजी एस्पेरजेनन्स तयार केली आहे. कंपनीने गिरीश तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम अंग प्रत्यारोपणादरम्यान होणाऱ्या सीएमव्ही संसर्गदोषावर उपचारासाठी सिडोफोव्हिर रेणू तयार केले आहे. तेलंग यांच्यासह मुकुंद गुर्जर हे एमक्युअरचे संचालक आहेत. त्यांचा नागपूर शहराशी संबंध आहे. नागपूर विद्यापीठातून एम.एसस्सी व पी.एचडी केल्यानंतर लंडन येथील क्वीन्स कॉलेजमधून पी.एचडी घेतली. पुणे येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत सात वर्षे काम करताना मुकुंद गुर्जर यांनी एमक्युअरसोबत चिरोल रेणू तयार केले. त्यामुळे एम्लोडाइपिनचे डोज तयार होऊन उच्च रक्तदाबासाठी निर्मित औषधांच्या किमती ५० टक्के कमी झाल्या. त्यांनी हे काम एमक्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मेहता यांनी बल्क औषधे तयार करण्याचा सल्ला दिला होता. सध्या एमक्युअर कंपनी या रेणूला एओमिक्स नावाने विकत आहे. मुकुंद गुर्जर यांनी टोरंटो येथून दोन वर्षांचा अॅडव्हांस कोर्स केला आहे. आज ते देशाची सेवा करीत आहे. त्यांनी सांगितले की, वर्ष २००२ मध्ये एमक्युअरने आपल्या १३ सामान्य उत्पादनांना अतिमहत्त्वपूर्ण उत्पादनांमध्ये परिवर्तित केले आहे. कंपनी अमेरिकेत औषधांची निर्यात करण्यावर विचार करीत आहे. नागपूर शहराशी संबंध असल्यामुळे भविष्यात नागपूरसाठी काही करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
कॅन्सरच्या रुग्णांसाठी कमी दरात औषध बनविण्याचे लक्ष्य
By admin | Published: June 10, 2017 2:53 AM