शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

देवा श्रीगणेशा... देवा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:08 AM

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, तूच करता आणि करविता... मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... म्हणत शुक्रवारी बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देपर्व मांगल्याचे : लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी चितारओळ परिसर भक्तांनी गजबजला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, तूच करता आणि करविता... मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... म्हणत शुक्रवारी बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक आणि बाजारपेठेत एकच लगबग होती. विदर्भात मूर्ती विक्रीचे प्रसिद्ध ठिकाण असलेली चितारओळ तर गणेशभक्तांनी खचाखच भरली होती. डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या, हातात टाळ आणि मुखातून विघ्नहर्त्याचा जयजयकार असे भक्तिमय उत्साहाचे वातावरण येथे अनुभवायला आहे. गुलालाची उधळण, ढोल ताश्यांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी चिमुकल्यांची लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर यात गणपती बाप्पा मोरया... एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, या जयघोषाने संपूर्ण परिसर प्रचंड उत्साहाने भरून गेला होता. काही बाप्पा वाद्यांच्या मिरवणुकीतून वाजत गाजत, काही मोटारसायकलवर, काही कार, आॅटोत स्वार होत घरोघरी, मंडळाच्या मंडपात विराजमान झाले.मनोहारी आणि आकर्षक बाप्पागणपती ही अशी देवता आहे, जी कुठल्याही रूपात आकर्षकच दिसते. त्यामुळे गाजलेल्या सिनेमातील एखादा पात्र, देव आणि संतांची वेगवेगळी रूपात गणराजाला मूर्तिकारांनी घडविले होते. सार्वजनिक मंडळांनी यावर्षी बाहुबली गणपतीला पसंती दर्शविली. रुद्र गणेश उत्सव मंडळ, जरीपटका यांनी नरसिंहाचा अवतार साकारला होता. भगवान शंकर, श्रीकृष्ण, ब्रह्मा विष्णू ,महेश या रूपात बाप्पांच्या मिरवणुका दिसून आल्या.गणेश मंडळाच्या लक्षवेधक वेशभूषागणेश उत्सवाच्या आगमनात वेगळेपणा जपण्यासाठी, गणेश मंडळांच्या सदस्यांच्या वेशभूषा लक्ष वेधून घेत होत्या. मंडळाच्या नावाचे टी-शर्ट काहींनी छापून घेतले होते. काही मंडळांनी शुभ्र वस्त्र आणि भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. काही मंडळाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत, हातात टाळ घेऊन गणरायाचा गजर करीत होते.या वेशभूषांमुळे बाप्पाच्या मिरवणुकीत वेगळेपण दिसून आले. मंडळांनी वेशभूषेबरोबरच, मिरवणुकीसाठी बाप्पाच्या वाहनांचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती.पोलिसांचे नियोजन वाखाणण्याजोगेगणरायाच्या आगमनाला चितारओळीत होणारी गर्दी प्रत्येकाने अनुभवली असेल. परंतु यावर्षी पोलिसांनी केलेले वाहतुकीचे नियोजनामुळे नागपूरकरांना गर्दीचा त्रास झाला नाही. पोलिसांनी गांधीबाग, चितारओळ, महाल, इतवारी, या परिसरात वाहतुकीचे अगदी सूक्ष्म नियोजन केले होते. रस्त्यावरचे ट्रॅफिक मॅनेजमेंट, डायव्हर्शन पॉर्इंट, पेट्रोलिंग आॅन रोड आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी चांगले प्लॅनिंग दिसून आले. येणाºया आणि जाणाºया वाहनांचे इंट्री पॉर्इंट फिक्स करण्यात आले. सीए रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून, मेट्रोवाल्यांचे सहकार्य घेण्यात आले. वाहतूक पोलिसांबरोबरच तहसील, कोतलवाली ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाºयांची मदत घेण्यात आली. वाहतुकीबरोबरच, लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर कंट्रोल करण्यासाठी २२५ पोलिसांची कुमक परिसरात तैनात होती. परिसरातील सर्व दुकानमालकांची बैठक घेतली. काही मंडळांना आदल्या दिवशीच मिरवणुकी काढण्याची विनंती पोलिसांनी केली. त्यामुळे परिसरातील वाहनांचा २५ टक्के भार कमी झाला. त्यामुळे एरवी होणारे ट्रॅफिक जॅम, वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, वाहनचालकांचा होत असलेला त्रागा यावेळी पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे झाला नाही.ढोल ताशा पथकांचे दमदार सादरीकरणबाप्पाच्या आगमनाचे स्वागत गेल्या काही वर्षांपासून शहरातील शिवसंस्कृती व बेधुंद ढोल ताशा पथक अतिशय दमदार करतात. बडकस चौकात त्यांचे सादरीकरण गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतात. पांढरेशुभ्र वस्त्र, डोक्यावर भगवा फेटा, गळ्यात मोठाले ढोल, हातात भगवा झेंडा आणि मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष एका शिस्तीत, एका तालमीत तरुण- तरुणी बेधुंद होऊन सादरीकरण करतात. ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाने चितारओळ परिसर दुमदुमुन जातो. या ढोलताशा पथकांबरोबरच परिसरातील बँण्ड पथकांन सुद्धा आपल्या पारंपरिक वादनाने बाप्पांचे स्वागत केले.डीजे बंद, ढोल ताश्यांचा दमपोलीस विभागाने गणपतीच्या मिरवणुकीत डीजेवर बंदी घातल्याने, चितारओळीसह संपूर्ण शहरात विविध शहरातून बँड पथक पोहचले होते. विदर्भात सर्वात मोठा गणेश उत्सव हा नागपुरात साजरा होता. शहरात १३०० हून अधिक गणेश मंडळ असल्याने ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यासाठी हे पथक शहरात वेगवेगळ्या भागात तैनात होते. डीजेवर बंदी आणल्याने या पथकांना गणेश मंडळांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. नागपूरसह अमरावती भागातील बाभुळगाव, धामणगाव, वर्धा , हिंगणघाट, चिमूर, पांढुर्णा येथून मोठ्या संख्येने बँड पथके आली होती. जागोजागी ही पथके ताल धरून वाजवित होती व कुणी आॅर्डर दिला तर त्यांच्या मिरवणुकीत वाजवायला जात होती. त्यांच्या तालासुरातील वाद्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.