लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात दडून बसलेला वाघ पुन्हा रविवारी दिसल्याची बातमी कानावर आल्यावर वनविभागाने जय्यत तयारी केली. वाघाला ट्रॅग्युलाईज करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे परवानगी मागून तांत्रिक प्रक्रियाही केली. त्याच्या शोधासाठी रविवारी रात्रभर पथकही फिरले. मात्र शोधासाठी निघालेल्या पथकाला वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली.मिहान परिसरातील वाघाला बोर राखीव व्याघ्र प्रकल्पाकडे जाताना पाहीले असले तरी रविवारी रात्री या कथित वाघाला मिहानलगतच्या तेल्हारा परिसरात पाहिल्याचा दावा करण्यात आला. ही माहिती वन विभामाच्या पथकाला मिळताच रविवारी रात्री ७.३० वाजता वन अधिकारी आपल्या थकासह संबंधित व्यक्तीला भेटले. मिहानमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने आपण वाघाला तेल्हारा तलावाकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. एवढेच नाही तर आपण जंगलालगतच्या गावात राहतो, त्यामुळे वाघाला ओळखू शकतो, असेही त्याने सांगितले. त्याने केलेल्या दाव्यावर विश्वास ठेऊन रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या चमुने सर्चिंग ऑपरेशन राबविले. या चमुने परिसरामध्ये पगमार्कही शोधून काढले. त्याची शहानिशा केली असता हे पगमार्क मात्र कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले.सध्या शोधकार्यात गुंतलेल्या पथकाला वेगवेगळ्या ठिकाणाहून वाघ दिसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. मात्र संबंधित ठिकाणी पोहचून तपास घेतल्यावर काहीच ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे या पथकाची वारंवार निराशा होत आहे.ट्रॅक्युलाईजची तयारीबुटीबोरी वन परिक्षेत्राच्या खडका, गुमगाव आणि मोंढा या गावापर्यंत प्रवास करून वाघ पुन्हा मिहान परिसरातच परतत असल्याने वन विभागाने त्याला ट्रॅक्युलाईज करण्याचीही तयारी सुरु केली होती. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे वनविभागाच्या या पथकाने परवानगही मागितली होती. वाघाला ट्रॅक्युलाईज करून बेशुद्ध केल्यावर त्याच्या मुळ अधिवासात सोडण्यासाठी परवानगी मागण्याची प्रकिमयाही सुरू केली होती. मात्र या सर्व तयारीची गरजच पडली नाही.गुरूवारनंतर पुन्हा बिबट्याची दडीअंबाझरी जैव विविधता पार्कमध्ये दडून बसलेल्या बिबट्याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. गुरूवारी तो कॅमेराट्रॅपमध्ये दिसला होता. त्यानंतर तो पुन्हा न दिसल्याचे दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरूच आहे.गुरुवारच्या सकाळी मेट्रो लिटिलवुड क्षेत्रातील गवताळ भागात तो काही मजुरांना दिसला होता. मजुरांनी ही बाब वनविभागातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. याच दरम्यान, वाडी क्षेत्रालगत लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्येही तो गुरूवाच्या रात्रीच दिसला. त्यामुळे मजुरांनी दिलेली माहिती खरी निघाली.शुक्रवारनंतर वनविभागाच्या पथकाने या परिसरातील संपूर्ण भागात शोध घेतला. मात्र त्याचा मागमूस लागू शकला नाही. बिबट अंबाझरी जैव विविधता पार्कमध्ये दडी मारून असू शकण्याची शक्यता गृहित धरून हे पार्कही पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.पिंजरे आणले, आदेशाची प्रतिक्षाया परिसरातील बिबट्याचा वावर आणि लागूनच असलेली मानवी वस्ती लक्षात घेता भविष्यातील धोका टाळण्यासाठी वन विभागाने त्याला पकडण्यासाठी पिंजरे आणले आहेत. वरिष्ठ पातळीवरून अद्याप यासाठी हिरवी झेंडी न मिळाल्याने आता आदेशाची प्रतिक्षा सुरू आहे.
शोधायला गेले वाघ, सापडला कुत्रा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 11:07 PM
वाघ शोधासाठी रविवारी रात्रभर वनविभागाचे पथक फिरले. मात्र वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली.
ठळक मुद्देट्रॅक्युलाईजचीही परवानगी : रात्रभर शोधूनही वाघ मिळालाच नाही