सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही दिशांना रेल्वेगाड्या जात आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावरून सध्या २२८ रेल्वेगाड्या जात आहेत. प्रवाशांची संख्याही वाढली असून, नागपूर रेल्वेस्थानकावरून सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून १५ हजार ६०० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. सध्या मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा, बिलासपूर, भगत की कोठी, गोरखपूर या महत्त्वाच्या मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू आहेत.
कर्नाटकमध्ये जाण्यासाठी टेस्ट, लस बंधनकारक
-महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट किंवा कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. याशिवाय रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या काही राज्यातील प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. यात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे.
या गाड्या कधी सुरू होणार ?
अ) ०२१४० नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
ब) ०२११४ नागपूर - पुणे गरीबरथ एक्स्प्रेस
क) ०२२२४ अजनी - पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस
ड) ०२१३६ नागपूर - पुणे एक्स्प्रेस
ई) ०२१५९ नागपूर - जबलपूर एक्स्प्रेस
या गाड्यात आरक्षण मिळेना
सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, सिकंदराबाद - पटना एक्स्प्रेस, बंगळुरू - पटना एक्स्प्रेस, पटना - सिकंदराबाद, पटना - बंगळुरू, त्रिवेंद्रम - गोरखपूर एक्स्प्रेस, सिकंदराबाद - गोरखपूर एक्स्प्रेस, बंगळुरू - गोरखपूर, पुणे - हावडा एक्स्प्रेस, मुंबई - हावडा एक्स्प्रेस या गाड्यात प्रवाशांना आरक्षण मिळत नसून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे.
पॅसेंजर गाड्यांचा अद्याप निर्णय नाही
प्रवाशांच्या दृष्टीने पॅसेंजर रेल्वेगाड्या महत्त्वाच्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांना कमी तिकीट देऊन प्रवास करणे शक्य होते. परंतु मागील दीड वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद केलेल्या आहेत. त्याऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. परंतु सध्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार नाही. रेल्वे बोर्डाने सुचना केल्यानंतर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील, असे अधिकारी सांगत आहेत.
आरटीपीसीआर किंवा लस घेणे गरजेचे
‘कर्नाटक राज्यात जाण्यासाठी ७२ तासांपूर्वी केलेली आरटीपीसीआर टेस्ट किंवा कोरोनाची किमान एक लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल किंवा लस घेतल्याचे प्रमाणपत्र प्रवासादरम्यान सोबत बाळगावे.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
..............