- मोरेश्वर मानापुरे नागपूर - आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले. खुलत्या बाजारात सकाळी जीएसटीविना ६५,५०० रुपयांवर असलेले दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर सायंकाळी ६६ हजार रुपयांवर पोहोचले.
शनिवारच्या तुलनेत सोमवारी सोने ३०० आणि चांदीचे दर प्रतिकिलो ४०० रुपयांनी वाढले. शनिवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ६५,७०० रुपये होते. सोमवारी खुलत्या बाजारात दर ३०० रुपयांनी कमी होऊन ६५,५०० रुपये, दुपारी ६५,७०० आणि सायंकाळी बाजार बंद होताना भाव पुन्हा एकदा ६६ हजारांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले. काही दिवसांपासून सोन्याच्या दरवाढीमुळे सराफा बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी असून उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या सोन्याचे दर कमी होण्याची काहीही शक्यता नाही. १ मार्चपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढतच आहेत. वाढत्या दरासोबतच लोकांची खरेदीही वाढली आहे. एका आठवड्यात चांदीच्या प्रति किलो २,३०० रुपयांची वाढ झाली.