शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 11, 2023 7:53 PM

पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत.

नागपूर: पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत. त्यामागे हमास व इस्राईल यांच्यातील युद्धाचे कारण समजले जात आहे. युद्धामुळे भारतात दोन्ही मौल्यवान धातू सोने आणि चांदीचे भाव वाढू लागले आहेत. नवरात्रोत्सवात सोने आणि चांदी अधिक चकाकणार आहे. 

३ टक्के जीएसटीसह सोने ६० हजारांवरजून महिन्यात ६३ हजारांपर्यंत गेलेले सोन्याचे दर काही दिवसांआधी ५७,३०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा दरवाढ होऊ लागली. बुधवारी सकाळी ५७,९०० रुपयांवर असलेले दर सायंकाळी ५८,२०० रुपयांपर्यंत वाढले. नवरात्रोत्सवात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर जाण्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर चांदीचे दरही प्रतिकिलो ७५ हजार रुपयांची जाणार आहे. बुधवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे दर ५८,२०० रुपये असून त्यावर ३ टक्के जीएसटी अर्थात १,७४६ रुपये आकारले असता दर ६० हजार रुपयांवर जातो.

चांदी ७५ हजार रुपयांवर जाणारसोन्याच्या दराप्रमाणेच दरदिवशी चांदीचेही दर वाढतात. त्यानुसार बुधवार, ११ ऑक्टोबरला शुद्ध चांदीचे प्रतिकिलो दर जीएसटी वगळून प्रतिकिलो ७०,५०० रुपये आणि जीएसटीसह ७२,६१५ रुपयांवर गेले आहेत. हे दर काहीच दिवसात ७५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढली आहे. ही मागणी दसरा आणि दिवाळीत दुप्पट, तिपटीवर जाईल. काही महिन्याआधी चांदीचे निव्वळ दर ७८ हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर दर खाली आले आणि आता पुन्हा हळूहळू वाढत आहेत.

२२ कॅरेटच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणीसराफा बाजारात २२ कॅरेटचे ८० टक्के दागिने विकले जातात. बहुतांश दागिने २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात. २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या भावात नेहमीच २,९०० रुपयांचा फरक असतो. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५८,२०० तर २२ कॅरेटचे भाव ५५,३०० रुपये होते. या दरावर ३ टक्के जीएसटी आकारला जातो. तर दागिन्यांवर जीएसटीसह १० ते १८ टक्क्यांपर्यंत घडणावळ शुल्क आकारले जाते.

हॉलमार्कचे चिन्ह पाहूनच दागिने खरेदी कराग्राहकाने सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यात दागिन्यांची शुद्धता दिसून येते. यामध्ये याची हमी सरकार देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अ‍ॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सोन्याचे दर आकाशाला भिडणारपितृपक्षात सोन्याचे बुकिंग करून नवरात्रात घरी नेण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. उतरलेल्या भावात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. पुढे सोन्याचे दर आकाशाला भिडणार आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स.

ग्राहकांची सोने खरेदी वाढलीयंदा पितृपक्षातही ग्राहकांची सोन्याची खरेदी वाढली आहे. ग्राहकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह आहे. ३ टक्के जीएसटीसह सोने आताच ६० हजार रुपयांवर गेले आहे. दरवाढ होण्याच्या शक्यतेने लोकांनी शोरूममध्ये आतापासून गर्दी केली आहे. - किशोरभाई सेठ, बटुकभाई अ‍ॅण्ड सन्स.

ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साहग्राहकांमध्ये सोने-चांदी खरेदीचा प्रचंड उत्साह आहे. लोक लग्नाची खरेदी याच दिवसात करीत आहेत. नवरात्रात सोने घरी नेण्याची त्यांची तयारी आहे. युद्धामुळे सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. भाव किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. - प्रदीप कोठारी, करण कोठारी ज्वेलर्स.

पहिल्यांदा दिसतेय पितृपक्षात खरेदीसोने-चांदीची खरेदी पितृपक्षात पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. दरवाढीची शक्यता ओळखून ग्राहक शोरूममध्ये खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. हे व्यवसायासाठी चांगले संकेत आहेत. नवरात्र ते दिवाळी हे दिवस सराफांना दिलासा देणारे असेल. - पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन.

टॅग्स :nagpurनागपूरGoldसोनं