नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम नागपुरात सराफा बाजारात नेहमीच दिसून येतो. यावर्षी जानेवारी महिन्यात सोन्याचे दर तब्बल ११ वेळ ६३ हजारांवर पोहोचले. दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर (९९.९ टक्के शुद्धता) ६३ हजार रुपये असल्यास ३ टक्के जीएसटीसह भाव ६५ हजारांवर जातात. सोन्याच्या दरवाढीमुळे गुंतवणुकदारांची खरेदी वाढली आहे.
जानेवारी महिन्यात १८ रोजी सोन्याचे दर सर्वात कमी ६२,३०० रुपये होते. १ ते ३० जानेवारीदरम्यान ६२,३०० ते ६३,७०० रुपयांदरम्यान चढउतार होत राहिली. नवीन वर्षात १ जानेवारीला सोने ६३,७०० आणि २ रोजी ६३,८०० रुपये तर ३० जानेवारीला भाव ६३,१०० रुपये होते. गेल्यावर्षी २८ डिसेंबर रोजी सोने ६३,८०० रुपयांवर पोहोचले होते, हे विशेष. याच कारणांनी फेब्रुवारी महिन्यात दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तर दुसरीकडे १ जानेवारीला चांदी दर प्रति किलो ७४,३०० रुपये आणि ३० रोजी ७२,५०० रुपयांपर्यंत कमी झाले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोने-चांदीचे दर (रुपयात)
दिनांक १० ग्रॅम सोने किलो चांदी१ जाने. ६३,७०० ७४,३००२ जाने. ६३,८०० ७४,३००३ जाने. ६३,४०० ७३,२००४ जाने. ६३,१०० ७२,३००५ जाने. ६३,००० ७२,५००६ जाने. ६३,००० ७२,९००१२ जाने. ६३,१०० ७३,०००१५ जाने. ६३,००० ७२,९००१६ जाने. ६३,००० ७२,६००२९ जाने. ६३,००० ७२,४००३० जाने. ६३,१०० ७२,५००(३ टक्के जीएसटी वेगळा)