लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम गुरुवारी देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. बुधवार ५०,१०० रुपयांच्या तुलनेत गुरुवारी सोन्यात ६०० रुपयांची वाढ होऊन ५०,७०० रुपयांवर स्थिरावले. तर चांदीत १ हजाराची वाढ होऊन किलो भावपातळी ६७,००० रुपयांवर गेली.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोने ५०,१०० रुपये आणि चांदीचे दर ६६,००० रुपये होते. गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने १०० रुपयांनी वाढले तर चांदीचे भाव स्थिर होते. दुपारच्या सत्रात सोने पुन्हा १०० रुपये तर चांदीत तब्बल १ हजाराची वाढ झाली. त्यानंतरच्या सत्रात ग्राहकांची सोन्याला मागणी वाढली. त्याचाच परिणाम म्हणून अखेरच्या सत्रात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ६०० रुपये वाढीची नोंद होऊन भाव ५०,७०० रुपयांवर गेले, तर १ किलो चांदीचे भाव ६७,००० रुपयांवर स्थिरावले. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव वाढतच आहेत.