लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा दिवस. मंगळवारी सोन्याच्या दर ३१ हजार या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतरही त्याच्या विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या विक्रीच्या आकडेवारी स्पष्ट झाले आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीमध्ये तब्बल २० टक्क्यांची वाढ आणि जवळपास ३० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफा क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना दिली. या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स, आॅटोमोबाईल आणि कपडे बाजारात गर्दी होती.हिºयांच्या दागिन्यांना मागणीधनत्रयोदशीला सोने-चांदीसह हिºयाच्या दागिन्यांना मागणी होती. हलक्या वजनातील हिºयाचे दागिने ग्राहकांनी खरेदी केले. यंदा हिºयांच्या दागिन्यांच्या विक्रीमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. सोन्याच्या एकूण विक्रीमध्ये नाण्यांच्या विक्रीचेही मोठे योगदान आहे. या दिवशी सोन्याची नाणी आणि बिस्किटांचीही विक्री झाली. धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफा व्यापाºयांनी व्यक्त केला.इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साहदिवाळीत नवीन वस्तू खरेदीची परंपरा आहे. धनत्रयोदशीला एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हनची जास्त विक्री झाली. गेल्या काही वर्षांपासून वित्तीय संस्थांचे शून्य टक्के व्याजदराचे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या किमतीच्या वस्तूंची खरेदी सुलभ झाली आहे. ५० हजार रुपये किमतीचे एलईडी, डबल डोअर फ्रिज आणि आधुनिक वॉशिंग मशीनची जास्त विक्री झाली. याशिवाय एसी आणि मोबाईलला जास्त मागणी होती. या शुभदिवशी सर्वच इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये गर्दी होती. धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची जवळपास २० कोटींची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.नवीन वाहनांची खरेदीवाहन खरेदीसाठी दसरा आणि धनत्रयोदशी हे शुभमुहूर्त आहेत. धनत्रयोदशीला पूर्वीच नोंदणी केलेले वाहन ग्राहकांनी घरी नेले. सर्व कंपन्यांच्या जवळपास २ हजार दुचाकी आणि ५०० चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या बाजारावर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही.धनत्रयोदशीला लग्नाची खरेदीधनत्रयोदशीला ग्राहकांकडून सोन्याच्या दागदागिन्यांना चांगली मागणी होती. ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली. सर्वच शोरूममध्ये सकाळपासूनच गर्दी होती. यंदा सोन्याच्या विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे महाल, बडकस चौक येथील रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने ग्राहकांनी लग्नाचीही याचवेळी खरेदी केली. अनेकांनी पूर्वीच आॅर्डर केलेले दागिने या शुभदिवशी घरी नेले. शोरुममध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता. नवीन ट्रेन्ड आणि आधुनिक डिझाईनचे दागिने खरेदीवर त्यांचा भर होता. अनेकांचा सोन्याचे नाणे खरेदीवर भर होता.सोने गुंतवणुकीचे साधनसराफा व्यापारी पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले, या दिवशी सोन्याचे दागिने आणि चांदीच्या भांड्यांना मोठी मागणी होती. चांदीचे ताट, वाट्या, ग्लास आदी भांडे किलोच्या दराने ग्राहकांनी खरेदी केले. यावर्षी चांदीचे भांडे खरेदीकडे ग्राहकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. भारतीयांकडून सणासुदीला परंपरेनुसार सोन्याची मोठी खरेदी केली जाते. सोने केवळ परंपराच राहिली नसून ते एक गुंतवणुकीचे चांगले साधन बनले आहे. गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित आणि अधिक परतावा देणारा सोने हा विश्वासाचा पर्याय म्हणून चांगलाच विकसित झाला आहे. म्हणून सणासुदीचे औचित्य साधून सोने खरेदी केली जात असल्याचे कावळे यांनी सांगितले.
धनत्रयोदशीला सोने झळाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:40 AM
धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा दिवस. मंगळवारी सोन्याच्या दर ३१ हजार या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतरही त्याच्या विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
ठळक मुद्दे३० कोटींची उलाढाल : इलेक्ट्रॉनिक्स व आॅटोमोबाईल बाजारात गर्दी