शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सोन्याची विक्री तिप्पट! सर्वच सराफांकडे खरेदीसाठी गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 8:31 PM

Nagpur News दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पाऊले सराफांकडे वळली. ३ टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे आणि दागिन्यांची खरेदी केली.

नागपूर : दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पाऊले सराफांकडे वळली. ३ टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे आणि दागिन्यांची खरेदी केली. शनिवारी सोन्याची विक्री तिप्पट झाली. सकाळपासून सराफांकडे लोकांची गर्दी होऊ लागली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ होऊन दरपातळी ६१,२०० रुपयांवर पोहोचली. दरवाढीनंतरही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह होता. नागपुरात सराफांचे जवळपास २५ मोठे शोरूम आणि २ हजारांपेक्षा जास्त दुकाने आहेत. ग्राहकांची या सर्वांकडे गर्दी होती. 

आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार वाढतात सोन्याचे दरआंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींनुसार भारतात सोन्याच्या दरात दररोज चढउतार होते. ६२,२०० रुपयांपर्यंत वाढलेले सोन्याचे दर १५ मे रोजी ६१,७०० रुपयांपर्यंत कमी झाले. त्यानंतर घसरण होऊन १६ मे रोजी ६१,५००, १७ मे रोजी ६१,०००, १८ व १९ मे रोजी ६०,८०० आणि २० मे रोजी सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढून ६१,४०० रुपयांवर गेले. या दरावर ३ टक्के जीएसटी अतिरिक्त आकारण्यात येतो.

आधीच्या नोटाबंदीसारखी परिस्थिती नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात लोकांमध्ये संतापाची लाट होती. ५०० आणि हजाराच्या नोट बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. पण आता तशी परिस्थिती नाही. लोकांना नोटा बदलवून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अन्य चलन सुरू असल्यामुळे लोकांच्या व्यवहारावर परिणाम होणार नाही. तीन ते चार वर्षांपासून एटीएममधून २ हजारांची नोट निघत नाही. त्यामुळे श्रीमंत वगळता सामान्यांकडे या नोटा नाहीच. अनिश्चितेमुळे सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोने खरेदीकडे वळल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.

५० हजारांपर्यंत केवायसी, २ लाखांपर्यंत पॅन कार्ड बंधनकारकरिक्स नको म्हणून २ हजाराच्या नोटांनी ५० हजारांपर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून केवायसी आणि २ लाखांपर्यंत पॅनकार्डची झेरॉक्स बंधनकारक केली आहे. अशी माहिती असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिली आहे. २ हजाराच्या नोटेसंदर्भात सतर्कता बाळगण्यात येत आहे.राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

टॅग्स :Goldसोनं