शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लॉकडाऊनमध्येही सोन्याची चमक वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:45 PM

कोरोना लॉकडाऊनने सराफा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यानंतरही सोन्याची चमक वाढली असून एक महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ६३०० रुपयांनी तर चांदीचे दर ६६०० रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देएक महिन्यात दर ६३०० रुपयांनी वाढले

आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनने सराफा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यानंतरही सोन्याची चमक वाढली असून एक महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ६३०० रुपयांनी तर चांदीचे दर ६६०० रुपयांनी वाढले आहेत.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे संचालक प्रदीप कोठारी आणि राजेश रोकडे म्हणाले, लॉकडाऊनने सराफा बाजार ठप्प झाला आहे, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा कल सोने-चांदी खरेदी करण्याकडे वाढला आहे. विविध वित्तीय संस्था सोन्याला तेलानंतर गुंतवणुकीचा दुसरा महत्त्वपूर्ण पर्याय समजतात. याच कारणाने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किमती वाढण्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून आला आहे.लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद असतानाही सोने आणि चांदीच्या दरात दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. यातून अंदाज लावता येऊ शकतो की, लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे दर ५० हजारांवर जातील. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,८०० रुपये प्लस जीएसटी आणि पक्की चांदीचे दर ४२ हजार रुपये प्लस जीएसटी आहेत. तर २० मार्च रोजी सोने ४१,५०० रुपये प्लस जीएसटी आणि चांदीे ३५,४०० रुपये दराने विकले होते.

लग्नसराई आणि ईदच्या सीझनमध्ये ग्राहकी ठप्पप्रदीप कोठारी व राजेश रोकडे म्हणाले, लॉकडाऊनमुळे लग्नसराई आणि ईदमध्ये ग्राहकी ठप्प आहे. यामुळे सराफा व्यावसायिकांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नागपुरात लहानमोठे ३ हजारांपेक्षा जास्त व्यापारी आहेत. नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगडचे ग्राहक खरेदीसाठी येतात. पण लॉकडाऊनमुळे ग्राहक येत नाहीत.

दागिने तयार करणारे कारागीर परतले स्वगृहीलॉकडाऊनमुळे दागिने तयार करणारे पश्चिम बंगालचे बहुतांश कारागीर स्वगृही परतले आहे. केवळ २५ टक्के कारागीर नागपुरात आहेत. सध्या तेसुद्धा दागिने तयार करीत नाहीत. त्यामुळे दागिन्यांची निर्मिती ठप्प झाली आहे.

अक्षय्य तृतीयेसाठी ऑनलाईन बुकिंगसराफा दुकान बंद असल्याने अक्षय्य तृतीयेला प्रत्यक्ष व्यवसाय होणार नाही. त्यामुळे काही सराफा व्यापाऱ्यांनी ऑनलाईन दागिने बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याअंतर्गत दुकानदाराच्या बँक खात्यात दागिन्याची रक्कम जमा करून ग्राहक लॉकडाऊननंतर दागिन्यांची डिलिव्हरी घेऊ शकतात.

शासनाने करात सूट द्यावीलॉकडाऊनमुळे सराफा व्यवसायात कोट्यवधींचे नुकसान होत असून त्यातून बाहेर निघण्यासाठी व्यापाऱ्यांना करात सूट देण्याची विनंती सरकारकडे केली आहे. कर्जावरील व्याज माफ करावे, दुकानातील कर्मचाºयांच्या वेतनात शासनाने योगदान द्यावे, दुकानांच्या किरायाच्या रकमेत सूट तसेच जीएसटीमध्ये सूट देण्याची मागणी आहे.

 

टॅग्स :GoldसोनंCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस