नागपूर : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येत आहे. सोमवार, २१ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ९७,२०० रुपयांवर पोहोचले. सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह लाख रुपयांवर विकल्या गेले. सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत २४ कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल ५,८०० रुपयांची वाढ झाली. त्या तुलनेत चांदी प्रतिकिलो ३,८०० रुपयांनी उतरली. शनिवारच्या ९५,८०० रुपयांच्या तुलनेत सोने १,४०० हजारांनी वाढून ९७,२०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीही १,३०० हजारांनी वाढून ९६,३०० रुपयांच्या तुलनेत भाव ९७,६०० रुपयांवर पोहोचली.
यावर्षी मिळाला २० टक्के परतावाट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असे तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला. यावर्षी १ जानेवारीला ७६,९०० रुपयांवर असलेल्या शुद्ध सोन्याचे भाव २१ एप्रिलपर्यंत ९७,२०० रुपयांपर्यंत वाढले. या दिवसात २०,३०० रुपयांची वाढ अर्थात ग्राहकांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची खरेदी वाढल्याचे जीजेसी आणि नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले.
सोने-चांदीचे भाव :दिनांक सोन्याचे भाव चांदीचे भाव१ एप्रिल ९१,४०० १,०१,४००५ एप्रिल ८९,१०० ८९,०००१० एप्रिल ९१,९०० ९२,३००१५ एप्रिल ९३,४०० ९५,८००१६ एप्रिल ९५,१०० ९७,८००१७ एप्रिल ९५,३०० ९६,३००१८ एप्रिल ९५,९०० ९६,३००१९ एप्रिल ९५,८०० ९६,३००२१ एप्रिल ९७,२०० ९७,६००(३ टक्के जीएसटी वेगळा)