आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोतून प्रवास करताना वर्धा जिल्ह्यातील एका वृद्धेची सोनाखळी बाजुला बसलेल्या महिलेने लंपास केली. रेणूबाई डोमाजी गवते (वय ६५) असे फिर्यादी वृद्धेचे नाव आहे. त्या हेटीकुंटी (ता. कारंजा, जि. वर्धा) येथील रहिवासी आहेत.त्या बुधवारी दुपारी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. सीताबर्डीतून त्या दुपारी २ वाजता आॅटोत बसल्या. बाजुलाच एक महिलादेखिल बसली होती. तुमच्या गळ्यातील सोनसाखळी कुणी चोरून नेईल, असे म्हणत तिने रेणूबार्इंना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले. रेणूबाईने तसेच केले. त्यानंतर लॉ कॉलेज चौकात ती महिला उतरून गेली. काही वेळेनंतर रेणूबाईने आपल्या बॅगमध्ये रुमालात बांधून ठेवलेली सोनसाखळी बघितली तेव्हा ती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या महिलेनेच ती चोरल्याचा संशय रेणूबाईने सीताबर्डी ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्या महिलेचा शोध घेतला जात आहेत.
नागपुरात आलेल्या वृद्धेची आॅटोमधून प्रवास करताना सोनसाखळी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:54 PM
आॅटोतून प्रवास करताना वर्धा जिल्ह्यातील एका वृद्धेची सोनाखळी बाजुला बसलेल्या महिलेने लंपास केली. रेणूबाई डोमाजी गवते (वय ६५) असे फिर्यादी वृद्धेचे नाव आहे. त्या हेटीकुंटी (ता. कारंजा, जि. वर्धा) येथील रहिवासी आहेत.
ठळक मुद्देगोड बोलून केली फसवणूक