नागपूर : हृदयाच्या आकाराचे असल्याने बुल्स हार्ट म्हणून ओळख असलेल्या गावरान सीताफळाचा सीझन आटोपला आहे. मात्र, सीताफळाची आवड असणाऱ्यांच्या जिभेला चवी देण्याची जबाबदारी मध्यप्रदेशातून आलेल्या गोल्डन सीताफळांनी उचलली आहे. रंगाने पांढरे पिवळसर, आकाराने मोठे आणि चवीने जास्त गोड असलेले हे सीताफळ बाजारात रंगत निर्माण करत आहेत.
विदर्भातील सीताफळाचा हंगाम संपला
सीताफळ हे विदर्भात रानफळ म्हणून ओळखले जाते. खेडोपाडी घरोघरी सीताफळाचे वृक्ष आढळतात. या फळांचा हंगाम उन्हाळ्याच्या उत्तरार्धापासून पावसाळ्यापर्यंत असतो. आता हे फळ दिसेनासे झाले आहेत.
गोल्डन सीताफळाची बिना येथून आवक
गोल्डन सीताफळाची आवक पूर्व विदर्भात मध्यप्रदेश येथील बिना येथून होते. सद्यस्थितीत ही फळे बाजारात उतरायला लागली आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा या फळांचा हंगाम असतो. डिसेंबरमध्ये नागपुरातील बाजारपेठा गोल्डन सीताफळाने फुलणार आहेत.
हनुमान सीताफळाची ही वाढणार क्रेझ
गोल्डन सीताफळाप्रमाणे बिना येथूनच येणाऱ्या हनुमान सीताफळाची ही आवक सुरू झाली आहे. हा सीताफळ गावरान किंवा गोल्डन प्रमाणे डोळसेदार नसून, चिकन्या स्वरूपाचा आहे. मात्र, हा सीताफळ ही चवीला गोड असल्याचे सांगितले जाते. हनुमंताच्या तोंडाप्रमाणे हा सीताफळ दिसतो, त्यामुळेच याला हनुमान हे नामकरण आहे.
नागपूरकरांसाठी पर्वणीच
सीताफळ चवीने गोड असल्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने खावे लागत असल्याने, नागपूरकरांना फार आवडतो. यात बियांचे प्रमाण जास्त असल्याने फुर्सतीला फळ म्हणूनही ओळखला जातो. गोल्डन सीताफळ नागपूरकरांसाठी नवीन असल्याने त्यांच्यासाठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे.
- संतोष महतो, स्ट्रीट फ्रूट विक्रेता
‘’