शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:19 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या मंचावर येत शाह यांनी जमलेल्या समर्थकांना हात उंचावत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भव्य हार घालून त्यांचे स्वागत केले.  

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी ११ वाजता नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.  विमानतळावर आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेषकुमार, माजी खासदार अजय संचेती, विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. डॉ. मिलिंद माने, परिणय फुके आदींनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. 

‘लोकमत’च्या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहतील. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘सुवर्णमुद्रा’ विशेषांकाचे, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण होईल. कार्यक्रम ठीक सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने निमंत्रितांनी १०.४५ पूर्वी स्थानापन्न होणे आवश्यक आहे. सोबत निमंत्रण पत्रिका व प्रवेशपत्र आणणे अनिवार्य आहे.

‘नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’ ‘ॲन्थम’चेदेखील लोकार्पण

n‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्री जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत नागपूर ॲन्थम- नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल. लोकार्पणानंतर गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ॲन्थम सुपूर्द करतील.

nनागपूरचे देशातील असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान, निसर्ग, पर्यटन, नागपूरकरांचा स्वभाव आदींचे वर्णन असलेल्या या ॲन्थमची संकल्पना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांची असून, प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. रचना प्रशांत इंगोले यांची, तर अजिंक्य सोनटक्के यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. संयोजन गौरी यादवडकर यांचे, तर सनी जैस्वाल यांनी चित्रीकरण केले आहे. एडिटिंग मुकुंद झरपुरिया आणि मिक्सिंग यशराज स्टुडिओचे विजय दयाल यांनी केले आहे. 

n‘लोकमत’ने अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ॲन्थम उपलब्ध केले आहे. हे ॲन्थम गृहमंत्री अमित शाह यांनी लोकार्पण केल्यानंतर दुपारी एकनंतर ॲक्टिव्हेट होईल. लोकमत डिजिटलवर हा सोहळा तुम्हाला पाहता येईल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLokmatलोकमतnagpurनागपूर