शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

सुनहरी यादे : बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:00 PM

जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.

ठळक मुद्देऋषिकेश रानडे, विभावरी जोशी-आपटे यांच्या स्वरांनी उजळली स्वरमैफिलसप्तकचा डॉ. विनय वाईकर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.सप्तकच्या वतीने पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात शनिवारी डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘सुनहरी यादे’ सादर झाला. नव्या दमाचे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे व विभावरी आपटे-जोशी यांनी ही गाणी सादर केली. एरवी चित्रपट गीतांचे कार्यक्रम दररोज होत असतात आणि रसिकही उत्स्फूर्त दाद देतात. मात्र, अशा मैफिलीत शब्दस्वरांची कैफियत रसिकांच्या हृदयाला भिडावी, असे क्षण क्वचितच दिसतात. गायकांची तयारी आणि रियाजातून निर्माण होणारा आर्जव अभावानेच दिसून येतो. चित्रपट गीतातील सुगम संगीतातील तो आर्जव, ते माधुर्य शनिवारी या कार्यक्रमात दिसून आले. गायकांच्या तयारीने रसिकांची मने जिंकली. एखादे गाणे आवडले म्हणजे सहजच रसिक ‘वन्स मोअर’ अशी दाद देत असतो. मात्र, एखाद्या गाण्यातील ते एखादे कडवे पुन्हा ऐकावे, अशी प्रगल्भ दाद जाणतेच देतात. अशी दाद देण्याचा सरावही अस्सल व कसलेल्या रसिक बैठकीतूनच होत असतो. अशा जाणिवेचा ‘वन्स मोअर’ शनिवारी गायकांना प्राप्त होत होता. एवढेच नव्हे तर तबल्यावर बरसणाऱ्या अंगुलीच्या तडाख्यातून व थापेतून निर्माण होणारे बोल रसिकांना ‘वन्स मोअर’चा आग्रह धरत होते, हेही जाणत्या रसिकतेचेच यश.यावेळी तुम आशा विश्वास हमारे, मैंने तेरे लिये ही, न जाने क्यों, जीवनसे भरी तेरी आंखें,याद किया दिलने, लग जा गले, भंवरेकी गुंजन, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, लाजून हासणे, धुंदी कळ्यांना, कल्पवृक्ष कन्येसाठी, बगळ्यांची माळ फुले, माझे मन तुझे झाले, जे वेड मजला लागले, मी डोलकर, मैं दिल हुँ एक अरमान भरा, अगर तो है तुमसे, आपके हसीन रूख पे, छुपालो युँ दिल में प्यार मेरा, रहें ना रहें हम, फुलो के रंग से, हमारे बाद अब महफिल में, एक प्यार का नगमा है... अशी गाणी सादर झाली. गायकांना कीबोर्डवर केदार परांजपे, दर्शना जोग, तबल्यावर विक्रम भट, ढोलकी व साईड रिदमवर विलास अंडुलकर यांनी साथसंगत केली. तत्पूर्वी गायक व वादकांचे स्वागत डॉ. वीणा वाईकर, अपर्णा वाईकर, डॉ. मनिषा पटवर्धन, डॉ. पल्लवी सिन्हा, समीर बेंद्रे यांनी केले. प्रास्ताविक अमित वाईकर यांनी केले तर संचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक डॉ. सुधीर भावे व रेणुका देशकर यांच्या संवादातून प्रत्येक गीताचा इतिहास रसिकांसमोर येत होता.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर