- आनंद डेकाटे नागपूर : एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात ४०० रुपयाची वाढ करीत ती हजार रुपयापर्यंत पोहोचवून निराधारांना दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे ६०० रुपये मानधन आहे तेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.मार्च ते मे या तीन महिन्याचे मानधन यंदा एकाच वेळी शासनाने जारी केले. प्रशासन म्हणते मानधन बँकेकडे वळते केले. बँक म्हणते जमाच झाले नाही. मार्च व मे महिन्याचे मानधन अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाही. लाभार्थी बँकेच्या चकरा मारत आहेत. मग हा निराधारांचा निधी गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून निराधारांच्या निधीचा पुरता गोलमाल सुरू आहे.या लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे अनुदान मिळाले होते. मार्चपासूनचे अनुदान मिळाले नाही. जून महिना सुरू झाल्यानंतरही लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. शासनाकडूनच ते यायचे होते. जून मध्ये मार्च, एप्रिल आणि मे अशा तिन्ही महिन्याचे अनुदान शासनाने एकाचवेळी मंजूर केले. हे अनुदान जवळपास २१ कोटी रुपये इतके होते. परंतु लाभार्थ्यांना केवळ एकाच महिन्याचे अनुदान मिळाले. तेही एप्रिल महिन्याचे मार्च आणि मे चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. मग हा निधी गेला कुठे?या लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे अनुदान मिळाले होते. मार्चपासूनचे अनुदान मिळाले नाही. दर महिन्याला लाभार्थी बँकेत जायचे पण अनुदान आलेच नसल्याचे त्यांना सांगितले जात होते.
निराधारांच्या निधीत गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:55 AM