लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी प्रकरणाची चौकशी केली आहे.मिश्रा यांनी बुधवारी या अहवालावर उच्च न्यायालयामध्ये आक्षेप दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने ते आक्षेप रेकॉर्डवर घेऊन अन्य पक्षकारांना त्यांचे काही आक्षेप असल्यास ते दोन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश दिलेत. यासंदर्भात उमेश बोरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम-१९९४ मधील कलम ५३ अनुसार शैक्षणिक शुल्काबाबतचे नियम/आदेश जारी करण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आहे. परंतु, मिश्रा यांनी गोमासे यांना हाताशी धरून ५ डिसेंबर २०१३ रोजी शिक्षण शुल्कवाढीचे अवैध पत्र काढून घेतले. त्या बळावर मिश्रा यांनी २०१३-१४ शैक्षणिक सत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मंजूर ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची शिष्यवृत्ती अवैधपणे उचलली असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अॅड. श्याम मोहता न्यायालय मित्र असून याचिकाकर्त्यातर्फे अॅड. ए. पी. दुबे, गोमाशे यांच्यातर्फे अॅड. विक्रम मारपकवार, इन्स्टिट्यूटतर्फे प्रा. सुनील मिश्रा तर, विद्यापीठातर्फे अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.
गोमासे व मिश्रा यांनी संगनमताने केला शिष्यवृत्ती घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:22 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश जी.एम. कुबडे यांनी प्रकरणाची चौकशी केली आहे.
ठळक मुद्देहायकोर्टात चौकशी अहवाल : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूटमधील प्रकरण