नागपूर : मागील आठवड्यापासून पारा घसरत आहे. गेल्या दोन दिवसात थंडी बरीच जाणवायला लागली असून विदर्भात गोंदिया आणि नागपूर अधिकच थंडावले आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यात विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. या बदलत्या वातावरणामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
नागपूरचा पारा या आठवड्यात सातत्याने घसरत आहे. मागील २४ तासात किमान तापमानामध्ये १.२ अंश सेल्सिअसने घट होऊन पारा १३.२ अंशाखाली घसरला. मंगळवारी रात्री थंडीचा परिणाम अधिकच जाणवत होता. बुधवारी दिवसाही वातावरणात थंडावा होता. गोंदियाचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते विदर्भात सर्वात कमी आहे. आठवडाअखेर पावसाचा इशाराया आठवडाअखेरअमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान केंद्राने वर्तविला आहे. आधीच थंडी वाढत असताना पुन्हा पावसाचे वातावरण झाल्यास थंडीत अधिक भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे....