शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

नागपूर, पुण्याच्या प्रवाशांसाठी गूड न्यूज, आठवड्यातून दोन दिवस समर स्पेशल ट्रेन

By नरेश डोंगरे | Published: April 07, 2024 10:05 PM

उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर.

नागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याने पुढच्या काही दिवसांत नागपूरहून पुणे किंवा पुण्याहून नागपूर असा रेल्वे प्रवास करण्याचा बेत ठरविणाऱ्या प्रवाशांना आतापासूनच घाम फुटला आहे. मात्र, त्यांच्यासाठी मध्य रेल्वेने 'गूड न्यूज' दिली आहे. होय, नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर १३ एप्रिलपासून द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये नागपूर-पुणे किंवा पुणे-नागपूर प्रवासाचा बेत आखणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये बाराही महिने प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत या गर्दीत मोठी भर पडते. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-पुणे-नागपूर उन्हाळी विशेष (समर स्पेशल) रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्यातून दोन वेळा अर्थात सोमवारी आणि शनिवारी ही गाडी धावणार असून, एकूण ३८ फेऱ्या मारून ती प्रवाशांना सेवा देणार आहे.

ट्रेन नंबर ०११६५ नागपूर-पुणे ही विशेष गाडी १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दर सोमवारी आणि शनिवारी रात्री ७:४० वाजता नागपूर स्थानकावरून प्रवासाला निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुण्याला पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीची ट्रेन नंबर ०११६६ पुणे-नागपूर ही गाडी १४ एप्रिलपासून प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी पुण्यातून दुपारी ३:५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपुरात येईल. या गाडीला एकूण १८ एलएचबी कोच राहणार आहे. त्यात दोन एसी टू टियर, १० एसी थ्री टियर इकॉनॉमी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि पार्सल, गार्ड ब्रेक व्हॅन तसेच एक जनरेटर कार संलग्न राहणार आहे.ठिकठिकाणच्या प्रवाशांना लाभ

नागपूर-पुणे-नागपूर मार्गावरील रेल्वे वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड चोरडलाईन आणि उरली रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. त्यामुळे या शहरात राहणाऱ्यांसोबतच आजूबाजूच्या गाव-परिसरातील प्रवाशांनाही या गाड्यांचा फायदा होणार आहे.