गुरुराज : लोकमत व बिरला सनलाईफचे ‘इन्व्हेस्टमेंट सूत्र’ मध्ये मांडले विचारनागपूर : कष्टाने मिळविलेल्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांजवळ म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे. याशिवाय अन्य कुठेही गुंतवणूक योग्य होणार नाही, असे प्रतिपादन बिरला सनलाईफ म्युच्युअल फंडचे सहायक उपाध्यक्ष (इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड बिझनेस डेव्हल्पमेंट) गुरुराज यांनी येथे केले.लोकमत समूह आणि बिरला सनलाईफ म्युच्युअल फंडच्यावतीने गुंतवणूकदारांच्या जागरूकतेसाठी आयोजित कार्यक्रम ‘इन्व्हेस्टमेंट सूत्र’मध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे २५ जून रोजी करण्यात आले होते. गुंतवणुकीचे महत्त्व सांगताना गुरुराज म्हणाले, म्युच्युअल फंडमध्ये नुकसान होण्याचा धोका कमी असतो. जेव्हा की यातून चांगली मिळकत मिळू शकते. गुंतवणूकदार आपल्या आवडीनुसार ‘बिरला सनलाईफ कंपनी’च्या म्युच्युअल फंडच्या इक्विटी आणि डेब्ट मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवू शकतात. ते म्हणाले, हे मोबाईलवरही सहज उपलब्ध आहे. यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. पारदर्शकता आणि करातील सूटचाही लाभ आहे. ते म्हणाले की, याला चिटफंडसारखे समजू नका. म्युच्युअल फंडअंतर्गत अनेक प्रकारचे फंड आहेत. जसे इक्विटी फंड, लिक्विड फंड, डेब्ट फंड, हायब्रीड फंड आणि एसआयपी. यात सोयीनुसार गुंतवणूक केली जाऊ शकते. फंडचे प्रकार आणि त्याच्या फायद्याविषयी बोलताना गुरुराज म्हणाले की, इक्विटी फंडमध्ये लांब कालावधीसाठी कमीतकमी १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत यात रक्कम वाढूनच परत मिळते. डेब्ट फंडमध्ये गुंतविलेली रक्कम शासकीय बॉण्ड आणि अन्य कंपन्यांमध्ये लावली जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. ते म्हणाले की, लिक्विड फंडमध्ये गुंतवणुकीचा धोका राहत नाही आणि निर्धारित वेळेपूर्वीच ‘रिटर्न’ १ टक्का जास्त मिळतो. याच पद्धतीने हायब्रीड आणि बॅलेन्स्ड फंड स्टॉक आणि डेब्टचे मिळताजुळते रूप आहे. शेवटी त्यांनी उपस्थित लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान, बिरला सनलाईफ म्युच्युअल फंडचे मुख्य विभागीय (गोवा आणि महाराष्ट्र) प्रशांत गुप्ता यांनी म्युच्युअल फंडच्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, लोक आपली गुंतवणूक आकांक्षा, बजेट किंवा शिल्लक, संकट किंवा बांधिलकी आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात; सोबतच महागाईच्या या काळात कधी ना कधी गुंतवणूक करण्याची गरज पडते. याचा प्रभाव रोजच्या आर्थिक व्यवहारात दिसून येत नाही, मात्र लांब कालावधीनंतर दिसून येतो. गुप्ता म्हणाले, महागाईचा सध्याचा दर ६ टक्के आहे. गेल्या १० वर्षांत क्रयशक्ती १००० रुपयांपेक्षा अर्धी राहणार आहे. येणाऱ्या २० वर्षांमध्ये ही एक चतुर्थ होईल आणि ३० वर्षांनंतर केवळ १५० रुपये होईल. त्यांनी गुंतवणूकदाराला सल्ला दिला की, आपले लक्ष्य निर्धारित करा आणि योजना तयार करा. लवकर गुंतवणूक करण्याचा सल्ला देत ते म्हणाले की, जर प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये १२ टक्के दराने जमा केले तर त्याची किमत ५० लाख रुपये होईल. इक्विटी, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. डोळे बंद करून गुंतवणूक करू नये, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली. गुरुराज आणि प्रशांत गुप्ता यांचे स्वागत ग्रुप इव्हेंट मॅनेजर आतिश वानखेडे यांनी केले. संचालन अमोल शेंडे यांनी केले. यावेळी सुमारे २०० गुंतवणूकदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय
By admin | Published: June 29, 2016 2:56 AM