लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन परिक्षेत्रात रविवारी दुपारी पुन्हा आग लागली. यावेळी ही आग गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वॉटर फिल्टर प्लाँटजवळील जंगलाला आग लागली. आगीचा धूर पाहून परिसरातील लोक इमारतीच्या छतावर चढून पाहू लागले. दुपारी ४ वाजता अग्निशमन दलला या आगीची सूचना मिळली. यानंतर एक गाडी जंगलाकडे रवाना झाली. ही आग किती क्षेत्रात पसरली होती, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. यासंबंधात गोरेवाडा वन अधिकाऱ्यांशीही संपर्क होऊ शकला नाही. गोरेवाडा जंगलात यापूर्वीही अनेकदा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी काटोल रोडच्या दिशेने असलेल्या वनक्षेत्राला आग लागली होती. येथे सध्या जंगल सफारी व कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. परंतु फिल्टर प्लाँटच्या दिशेने पहिल्यांदाच आग लागली. याशिवाय हिंगणा वनक्षेत्राला लागून असलेल्या चनकापूर (नेरी) परिसरातील महसूल विभागाच्या झुडपी जागेतही रविवारी दुपारी आग लागली. शनिवारी दुपारीसुद्धा या परिसरात आग लागल्याचे सांगितले जाते.
नागपूरच्या वनपरिक्षेत्रातील गोरेवाडा जंगल पुन्हा पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:10 AM
गोरेवाडा वन परिक्षेत्रात रविवारी दुपारी पुन्हा आग लागली. यावेळी ही आग गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वॉटर फिल्टर प्लाँटजवळील जंगलाला आग लागली.
ठळक मुद्देहिंगणा रेंजमध्येही लागली आग नागरिकात भीतीचे वातावरण व्यापक उपाययोजना कधी ?