लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काहिसा हळुवार पण तेवढाच श्रवणीय आणि मखमली स्वरांचा जादूगार म्हणजे गायक डॉ. येसूदास. येसूदास म्हटले की, ‘सुनैना..., गोरी तेरा गाव बडा प्यारा..., तेरे आने से सज गयी हमरी...’ अशी कर्णमधूर गाणी सहज ओठांवर येतात. त्यांच्या स्वरातील ही गाणी भावनांना हात घालणारीच आहेत. येसूदास यांच्या या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम श्रोत्यांची मने जिंकून गेला.कला क्षेत्रातील नवीन गायकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरगम सांस्कृतिक संघटना व साऊथ इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच साई सभागृह येथे डॉ. येसूदास यांच्या गीतांनी सजलेल्या ‘सुनैना’ या सुमधूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूरचे येसूदास अशी ओळख असलेले गायक एम.व्ही. उन्नीकृष्णन यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमात त्यांनी येसूदास यांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली. त्यांच्यासोबत सखी साहू, मनीष नायर, ऐश्वर्या नागराजन, आर्य राजूकर, सेबी जेम्स, पार्वती नायर, जयराम या गायक कलावंतांचाही सहभाग होता.उन्नीकृष्णन यांनी ‘शाम रंग रंगा रे...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा...तेरी तस्वीर को सीने से..., खुशीया ही खुशीया है..., सुनैना..., तुझे देखकर जगवाले पर..., धीरे धीरे सुबह हुयी...’, सखी साहूसोबत ‘जानेमन जानेमन...’, पार्वती नायरसह ‘मधुबन खुशबू देता है...’ तर ऐश्वर्यासह ‘कहां से आये बदरा...’ ही युगुल गीते समरसतेने सादर केली. यानंतर ‘आओ हुजूर..., शीशा हो या दिल हो..., मेरे सपनो की रानी कब..., तडप तडप के..., ये काली काली आँखे..., झनक झनक तोरी बाजे..., लागा चुनरी मे दाग...’ अशी नवी जुनी लोकप्रिय गीते गायक कलावंतांनी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुष्पा आनंद यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी किबोर्डवर पंकज सिंह, ऑक्टोपॅडवर शिवा सरोदे, तबल्यावर प्रमोद बावणे, गिटारवर मनोज विश्वकर्मा, ढोलक व तुबावर क्रि ष्णा जवंजारे या वाद्यवृंदांनी साथसंगत केली. प्रकाश व्यवस्था सुनील, साऊंड अशोक रेड्डी तर सजावट राजेश अमीन यांची होती. कार्यक्रमाला साऊथ इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष नागराजन व सचिव रवी अय्यर प्रामुख्याने उपस्थित होते.
गोरी तेरा गाव बडा प्यारा... येसूदास यांच्या गीतांची बहारदार मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:47 AM
काहिसा हळुवार पण तेवढाच श्रवणीय आणि मखमली स्वरांचा जादूगार म्हणजे गायक डॉ. येसूदास. येसूदास म्हटले की, ‘सुनैना..., गोरी तेरा गाव बडा प्यारा..., तेरे आने से सज गयी हमरी...’ अशी कर्णमधूर गाणी सहज ओठांवर येतात. त्यांच्या स्वरातील ही गाणी भावनांना हात घालणारीच आहेत. येसूदास यांच्या या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम श्रोत्यांची मने जिंकून गेला.
ठळक मुद्दे साऊथ इंडिया असोसिएशनचे आयोजन