लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिस खात्यात नोकरीला लागल्यानंतर मुंबईला गानकोकिळा लतादीदींसोबत पोस्टींग मिळाली. गीतांचा चाहता असल्याने, खूप आनंद झाला. जणू देवच मिळाल्याची भावना निर्माण झाली आणि तेव्हापासून गाणे शिकायला सुरुवात केली. तेव्हाच कल्पना आली की, असा कार्यक्रम करावा ज्यातून सामान्यांना प्रेरणा मिळेल. मग काय, मोटीव्हेशन स्पीकर आणि सिंगर झालो, असे म्हणत पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी अनेक प्रेरणादायी गीते सादर केली.युवापिढीसाठी प्रेरणादायी असे वक्ते आणि गायक पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांचा संगीतमय कार्यक्रम सोमवारी मधुरम हॉलमध्ये पार पडला. कैलाश तानकर यांचे प्रेरणादायी भाषण आणि प्रेरक अशा गीतांचा हा कार्यक्रम होता. डॉ. ममता व सोनल सुडोकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘जिंदगी का सफर’ या गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा, असे सांगत त्यांनी आपण या जगात सुखमय, शांतीपूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले. त्यांनी.. निले गगन के तले, सावन का महिना, वी विल रॉक यू, पग घुंगरू, कोरा कागज था, सैया दिलमें आना रे अशी गाणी सादर केली. सुपर सिंगर श्रावणी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. डॉ. ममता, अमरनाथ, सतीश, सायोनी, दीपाली, अनूप, कामिनी, माधुरी, स्वामीनाथन, सोनल, मुकेश, सागर, जयश्री, यश, बोबिता व श्रेया यांचा कार्यक्रमात सहभाग होता. जय जय शिवशंकर या गीताने कार्यक्रमाचा शानदार समारोप झाला.
लतादिदींसोबत पोस्टिंग मिळाली अन् गाणे शिकणे सुरू झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 7:18 PM
पोलिस खात्यात नोकरीला लागल्यानंतर मुंबईला गानकोकिळा लतादीदींसोबत पोस्टींग मिळाली. मग काय, मोटीव्हेशन स्पीकर आणि सिंगर झालो, असे म्हणत पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी अनेक प्रेरणादायी गीते सादर केली.
ठळक मुद्देपोलीस अधिकारी कैलाश तानकर यांनी व्यक्त केली भावनाप्रेरणादायी गीतांनी रंगला कार्यक्रम