शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘दलित’ शब्दाचा वापर थांबवण्यास शासन अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 4:38 AM

शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यात या शब्दाचा वापर थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.

नागपूर : शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यात या शब्दाचा वापर थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.दलित शब्दाचा उपयोग थांबविण्यासाठी राज्य शासनाला अनेक पत्रे प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात पंकज मेश्राम यांची जनहित याचिकाही प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने या विषयावर गांभिर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने या विषयावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत येत्या १२ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचा आदेश दिला. तसेच, बैठकीमध्ये याचिकाकर्ते पंकज मेश्राम व त्यांचे वकील अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांना बाजू मांडण्याची अनुमती दिली.सर्वोच्च न्यायालयाने ‘एस.पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ या प्रकरणामध्ये शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच, लता सिंग वि. उत्तर प्रदेश शासन व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू शासन प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचेही हेच मत आहे. ‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचक आहे. परिणामी, ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शब्दाचा सर्वत्र वापर करावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारCourtन्यायालय