शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:28 AM

केंद्र व राज्यातील सरकार मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देविदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरम परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूलभूत समस्यांवर विचार झाला तर त्या सोडविता येतात. विदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमने मुस्लीम समाजाच्या प्रश्नावर चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. यातून समाजहिताचे निर्णय होतील. परिषदेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. केंद्र व राज्यातील सरकार मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. सदर येथील अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात विदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमच्यावतीने ‘मुस्लिमांच्या समस्या व समाधान’यावर आयोजित एकदिवसीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. यावेळी फोरमचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार, झकात फाऊं डेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमूद, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा प्रामुख्याने उपस्थित होते.आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर भेदभाव करीत नाही. आपले विचार वेगवेगळे असू शकतात. परंतु यावर चर्चा झाली पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. यासाठी सहकार्य, संवाद व समन्वयाची गरज आहे. मुस्लीम समाजातील मुलींना इंजिनिअर होता यावे, यासाठी अंजुमन संस्थेला अभियांत्रिकी दर्जा दिला. समाजात अशा स्वरूपाचे बदल होत आहेत. इंटलेक्चुअल फोरमच्या आवाहनामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिवर्तन होईल. कोणत्याही समाजाच्या प्रगतीची जबाबदारी ही सरकारची असते. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. एचसीएलसारख्या आयटी कंपन्यांमध्ये सर्व समुदायातील युवकांना नागपूरच्या मिहान प्रकल्पात रोजगार मिळत आहे. उज्ज्वला, पंतप्रधान आवास योजना या योजनांचा लाभ सर्वच समाजघटकांना मिळत आहे. यांत्रिक पद्धतीने संचालित इलेक्ट्रीक रिक्षा देशभरात परिवहन मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.झकात फाऊं डेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमूद यांनी मुस्लिमांचे शासनाप्रति असलेले प्रश्न यावर बोलताना मुस्लिमांचे संसदेतील प्रतिनिधित्व, वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकासाठी भारतीय वक्फ सेवेचे गठन, शैक्षणिक संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा व सच्चर आयोगाच्या शिफारशींवर यावेळी प्रकाश टाकला. परिषदेत विदर्भातील मुस्लीम समाजातील उच्चशिक्षित, बुद्धिजीवी, फोरमचे पदाधिकारी, विदर्भातून आलेले मुस्लीम विचारवंत, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.

नोकरी मागण्यापेक्षा देणारे व्हाविकासाचा संबंध हा कुठल्याही राजनैतिक व धार्मिक भावनेशी निगडित नसून तो गुणवत्तेला प्राधान्य देतो व या गुणवत्तेची क्षमतावृद्धी करणे गरजेचे असते. आरोग्य, निवारा, पिण्याचे पाणी, चांगल्या शैक्षणिक सुविधा भावी पिढीसाठी महत्त्वाच्या आहेत. समाजात किती प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, अभियंते निर्माण झाले यापेक्षा किती उद्योजक निर्माण झाले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे अशी मानसिकता अंगिकारणे महत्त्वाचे आहे, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

समाजाला नवी दिशा मिळेलकोणत्याही समाजाचा विकास शिक्षण घेतल्याशिवाय शक्य नाही. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक होण्याची गरज आहे. मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमने मुस्लीम समाजाची समस्या मांडली. एक जबाबदार राजकारणी म्हणून मुस्लीम समाजाचे प्रश्न व समस्या गांभीर्याने घेतल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी स्वत: तसेच पक्षपातळीवर विचार करू. परिषदेच्या माध्यमातून होणाºया चर्चेतून समाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी