लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यापाऱ्यांचा माल कोणत्याही सीमेवर पोलिसांनी थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हेल्पलाईन ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करून समाधान होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध असून संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोबाईल स्पीकरवरून बातचीत केली आणि व्यापाऱ्यांतर्फे प्रशासनाला मदत करण्यासाठी आभार मानले. संकटसमयी लोकांची सेवा करावी आणि माल योग्य व किफायत दरातच विकावा, असे आवाहन राऊत यांनी व्यापाऱ्यांना केले.जिल्हाधिकारी म्हणाले, हेल्पलाईन क्रमांकावरून व्यापाऱ्यांचे समाधान करून सहकार्य करण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला आपला माल देशाच्या कोणत्याही शहरात पाठवायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कुंभारे यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा. या माध्यमातून कार्यालयातून संबंधित पास आणि आरटीओकडूनही पास देण्यात येईल. स्टीकर वा बॅनर लावलेला ट्रक थांबविला जाणार नाही. नागपूरच्या आसपास माल घेऊन जाणारे ट्रान्सपोर्ट सुरू करण्यात येईल. जीवनाश्यक वस्तूंच्या नियमित पुरवठ्यासाठी शासन मदत करेल. ते म्हणाले, शासनातर्फे ५० हजार कुटुंबीयांना रेशनचे पॅकेट बनवून देण्यात येणार आहे. मालाच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी यावेळी दिले.बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आशा पठाण व कुंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, सहसचिव पवन पोद्दार, ऑईल मिल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, सचिव परमानंद मोतीयानी, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष रामदास वजानी, दाल मिल असोसिएशनचे दिलीप शाह, किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह, हजारीलाल नागपाल, भरत ठक्कर, संजय सूचक आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:24 IST
व्यापाऱ्यांचा माल कोणत्याही सीमेवर पोलिसांनी थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हेल्पलाईन ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करून समाधान होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध असून संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध : जिल्हाधिकारी
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी हेल्पलाईनची मदत घ्यावी