शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

कौशल्य विकास प्रकल्पाला सरकारचे सहकार्य

By admin | Published: February 29, 2016 2:59 AM

माळी समाज उद्योजक प्रदर्शन संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र येण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : माळी समाज उद्योजक प्रदर्शन व संमेलनाचा समारोपनागपूर : माळी समाज उद्योजक प्रदर्शन संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र येण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले. यातूनच स्थापन झालेल्या महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडियाच्या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासाचा उपक्रम राबवा. या उपक्रमाला राज्य सरकारकडून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. मानेवाडा -बेसा रोड येथील संत सावता महाराज सांस्कृतिक लॉन येथे आयोजित उद्योजक क्रांती २०१६, माळी समाज उद्योजक क्रांती प्रदर्शन व संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, माजी आमदार अशोक मानकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कार्यक्रमाचे संयोजक अविनाश ठाकरे, उद्योजक शंकरराव बोरकर, डी.बी.महाजन, रंजन गिरमे, विश्वास महादुरे आदी उपस्थित होेते.महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून समाजकार्य केले. त्यांनी समाजालाच नाही तर देशाला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिला. त्यांच्या नावाने महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडिया या उद्योग व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. ही गौरवास्पद बाब आहे. समाजातील तरुणांना उद्योगाप्रति एक वेगळी दिशा देण्याचे कार्य उद्योजकांनी करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी समाजातील मान्यवरांचा फडणवीस व गडकरी यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)५ लाख कोटींची विकास कामेगेल्या २० महिन्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून १.५ लाख कोटींची रस्त्यांची कामे करण्यात आली. पुढील दोन वर्षात ५ लाख कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. उद्यमशीलतेतून समाज उन्नत होतो. महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडिया माध्यमातून अनेकांना मदत होईल. अविनाश ठाकरे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना. अशी प्रेरणा या उद्योजक क्रांती मेळाव्याच्या माध्यमातून घ्यावी. असे आवाहन करून गडकरी यांनी चेंबर आॅफ कॉमर्स इंडियाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. विविध उद्योगांचे १२० स्टॉलमाळी समाज उद्योजक क्रांती प्रदर्शनात १२० उद्योजकांनी स्टॉल लावले. यात कृषी साहित्य, मरिन, गृहोपयोगी साहित्य, पुस्तक व साहित्य प्रकाशन अशा विविध क्षेत्रातील राज्यातील उद्योजक सहभागी झाले होते. माळीनगर येथील सहकारी साखर कारखाना, केसरी टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स, आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज, नागोबा इंडस्ट्रीज, स्वीप ट्रेडर इंडस्ट्रीज, यासह शासनाच्या विविध विभागांनी कौशल्य विकास, उद्योग, अर्थसाहाय्य विषयक माहिती देणारे स्टॉल लावले होते. तीन दिवसात हजारो युवकांनी व इच्छुकांनी याचा लाभ घेतल्याची माहिती अविनाश ठाकरे यांनी प्रस्ताविकातून दिली.मरणोत्तर उद्योजक पुरस्कारराजाराम शिवराम निर्वाण, तात्यासाहेब ऊर्फ गं.वि.हिवसे, सदाशिवराव महादुरे, महादेवराव मानकर आदींना मरणोत्तर उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांच्या नातेवाईंनी मान्यवरांच्या हस्ते ते स्वीकारले. तसेच लाईफटाईम अचिव्हमेंट उद्योजक पुरस्कार, महिला उद्योजक पुरस्कार व यंग अचिव्हर उद्योजक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.