शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासात घेत नाही : विनय अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:15 AM

सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे आयएमएच्या ‘निमॅकॉन’ परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने ‘निमॅकॉन-२०१८’ परिषदेत शनिवारी डॉ. किशोर टावरी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘वैद्यकीय सामाजिक परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. आरती आनंद यांनी विशेष अभिप्राय सादर केला.डॉ. अग्रवाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या वैद्यकीय सामाजिक परिस्थितीत फार बदल झाला आहे. त्यावेळी भारतीय माणसाचे सरासरी वय ३२ होते. ते आता ६८ वर पोहचले आहे. हे केवळ बदलत्या वैद्यकीय परिस्थितीचे द्योतक आहे.परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आधुनिक उपचार पद्धतींच्या आश्चर्यजनक प्रगतीचा आलेख सादर केला. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सर्जरीपासून, मधुमेहासारख्या आजारांच्या उपचारांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरुवात प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजय कडुस्कर यांच्या व्याख्यानाने झाली. डॉ. आश्विनी तायडे,डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. आलोक उमरे, डॉ. मिलिंद भुशुंडी, डॉ. ईश्वर गिलाडा, डॉ. प्रशांत भांडारकर, डॉ. संजय देशपांडे, डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, डॉ. सुरेश चावरे व डॉ. राजेश सिंघानिया आदींचे अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान झाले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. ललित वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण तंत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून ते आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. रवि वानखेडे यांनी अवयवदान या विषयी जनजागरणाची आवश्यकता प्रतिपादित केली. डॉ. अजय काटे यांनी शस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे व डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernmentसरकार