लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे. यापुढेही शेतकरी अडचणीत आला तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्कआणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय समारंभात बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला.खा.डॉ. विकास महात्मे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, अप्पर आदिवासी आयुक्त डॉ.माधवी खोडे, वस्त्रोद्योग संचालक संजय मीना आदी उपस्थित होते.कुठलीही अट न ठेवता सरसकट असे दीड लाख रु पयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ६६हजारांपेक्षा जास्त शेतकºयांना लाभ होणार असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, राज्यात पाऊस नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शासन यावर तत्परतेने उपाययोजना करीत आहे. राज्यातील शेतकºयांसाठी कृषी सौरपंपाद्वारे सिंचन हा उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात येत असून, येत्या काळात ४० लाख शेतकºयांना कृषिपंपासाठी असलेले फीडर सौरऊर्जेवर परावर्तित करून शेतकºयांना दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारची सर्वोच्च प्राथमिकता शेतकºयांचा सर्वांगीण विकास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन वर्षांत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नसून, प्रत्येकाला घरकूल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सागितले.यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्याहस्ते २०१६-१७ या वर्षांचे जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत बनपुरी तालुका पारशिवनीला पाच लक्ष रुपये, द्वितीय ग्रामपंचायत धानला, तालुका मौदा तीन लक्ष रुपये तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायात सुरादेवीला दोन लक्ष रुपये तसेच विशेष पुरस्कारामध्ये स्व. आबासाहेब खेडकर स्मृती कुटुंबकल्याण पुरस्कार २५ हजार ग्रामपंचायत आलागोंदी, तालुका, नागपूर, स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन २५ हजार रुपये ग्रा.पं. खापरी (उबगी) तालुका कळमेश्वर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार २५ हजार ग्रा.पं. मनोरा ता. भिवापूर यांना देण्यात आला.अधिकाºयांचा गौरवउल्लेखनीय सेवेबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापिसंह पाटणकर यांना तसेच अपर पोलीस आयुक्त गडचिरोली कॅम्प नागपूर, अंकुश शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस सेवापदक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कठीण व खडतर परिस्थितीतील कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक अजित देशपांडे, सहायक फौजदार मुधोरकर, सहा. फौजदार ज्ञानेश्वर इत्तडवार, पोलीस हवालदार गोविंद काकडे, पोलीस शिपाई सतीश पाटील यांना विशेष सेवापदक देऊन गौरवण्यात आले.उत्कृष्ट कार्याचा गौरवनागपूर जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा बेलदा ता. रामटेकचे मुख्यध्यापक एन.एल. भास्करे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. तसेच जिल्हधिकारी कार्यालयातील गनर नीलेश घोडे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या आपला जिल्हा नागपूर या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरकार शेतकºयांच्या सोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:43 AM
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही : स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन उत्साहात