नागपूर शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १७ रुग्णालयांचा महात्मा गांधी जीवनदायी योजनेत समावेश केला होता. यातील चार रुग्णालये सरकारी होती. १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या काळात चार सरकारी रुग्णालयात १०७४ रुग्णांवर उपचार झाले. तर १३ खासगी रुग्णालयात केवळ १५० रुग्णांना लाभ देण्यात आला. विशेष म्हणजे जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णालयांना २५ टक्के खाटा आरक्षित ठेवायच्या होत्या.
- दृष्टिक्षेपात
१) १७ रुग्णालयात ७,८९७ खाटा उपलब्ध होत्या.
२) २५ टक्के अन्वये १९४७ खाटा गरीब व गरजू रुग्णांसाठी ठेवणे बंधनकारक होते.
३) १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ पर्यंत १२२४ रुग्णांना लाभ देण्यात आला.
४) चार सरकारी रुग्णालयांमध्ये १०७४ रुग्णांवर उपचार झाले.
५) १३ खासगी रुग्णालयांमध्ये १५० रुग्णांवर उपचार झाले.
- ५,६४६ रुग्ण लाभापासून वंचित
१ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या काळात नागपुरातून ६,८७० रुग्णांनी योजनेच्या लाभाकरिता अर्ज भरले. त्यापैकी एकूण फक्त १२२४ रुग्णांनाच लाभ देण्यात आला. उर्वरित ५,६४६ रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहिले.
- १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ दरम्यान जीवनदायी योजनेंतर्गत किती रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले, यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचतर्फे माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली. मिळालेल्या माहितीत रुग्णालयांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले. आता तिसरी लाट येणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना २५ टक्के खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक करावे, जेणेकरून गरीब व गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक होणार नाही.
आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच