नागपूर हायकोर्टातील सरकारी वकिलांना दुसऱ्यांदा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:46 PM2018-11-06T23:46:44+5:302018-11-06T23:48:15+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील १९ सहायक सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांना दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील १९ सहायक सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांना दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली.
या वकिलांमध्ये निखिल जोशी, वलय मालधुरे, अंबरिश जोशी, जयवंत घुरडे, प्रकाशचंद्र टेंभरे, नीरज जावडे, हर्षवर्धन धुमाळे, श्यामल कडू, अमित बालपांडे, रितू कालिया, हर्षदा प्रभू, श्याम बिस्सा, आलाप पळशीकर, भगवान लोणारे, अर्चना कुलकर्णी, मृणाल नाईक, गीता तिवारी, चारुहास लोखंडे व विशाल गंगणे यांचा समावेश आहे. या वकिलांची ७ नोव्हेंबर २०१५ रोजी दोन वर्षांसाठी सहायक सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. तो कार्यकाळ ६ नोव्हेंबर २०१७ रोजी संपल्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांना आता दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे हे वकील ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कार्यरत राहतील.