शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय : भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 9:09 PM

राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करीत भाजपने मंगळवारी राज्यभरात आंदोलन केले. नागपुरातही याचा परिणाम दिसून आला.

ठळक मुद्देशहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करीत भाजपने मंगळवारी राज्यभरात आंदोलन केले. नागपुरातही याचा परिणाम दिसून आला. शहरातील सर्व विधानसभा मतदार क्षेत्र आणि ग्रामीणमधील १३ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलनाचे नेतृत्व केले.छापरूनगर चौकात धरणे आंदोलनादरम्यान आ. कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारवर प्रहार केला. राज्य सरकारने जर डीपीसीच्या निधीत कपात केली तर जिल्ह्यातील मंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी माजी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, भाजपच्या कार्यकाळात २०० कोटी रूपयाची डीपीसी ५०० कोटीवर पोहोचली. आता महाविकास आघाडी सरकारने ती पुन्हा २५० कोटी रुपये करण्याची तयारी केली आहे. सरकारमध्ये एकमत नाही. ऊर्जामंत्री १०० युनिटपर्यंत वीज नि:शुल्क करण्याची घोषणा करतात. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र हे शक्य नसल्याचे सांगतात. सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही. कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारावर सरकारला घेरले. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, प्रमोद पेंडके, बाल्या बोरकर, राम आंबुलकर, सचिन करारे, चेतना टांक, भोजराज डुंबे, चंदन गोस्वामी, नरेंद्र लांजेवार, देवेन मेहरा, कांता रारोकर, मनीषा धावडे आदी उपस्थित होते. 

यापुढे गाव व मतदान केंद्रावर आंदोलनआता ज्या गावांवर अन्याय झाला. ज्या गावातील विकास कामे बंद पडली, त्या गावामध्ये व मतदान केंद्रावर जाऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.डीपीसी निधी, थांबलेली विकास कामे, मुख्य मुद्देशहरात सहा ठिकाणी आंदोलन करून भाजपने राज्य सरकारविरुद्ध जोरदार नारेबाजी केली. स्थगित केलेली विकास कामे पुन्हा सुरू करण्यात यावी, जिल्ह्याला डीपीसीचा निधी पूर्ण मिळावा, महिलांवरील वाढते अत्याचारावर नियंत्रण लावण्यात यावे या मुख्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. दक्षिण-पश्चिम नागपुरात छत्रपती चौकात महापौर संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर कोहळे, पश्चिम नागपुरात गिट्टीखदान चौकात माजी आमदार सुधाकर देशमुख, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, उत्तर नागपुरात कमाल चौकात माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम, मध्य नागपुरात चितार ओळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आ. गिरीश व्यास व आ. विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दक्षिण नागपुरात सक्करदरा चौकात आ. मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. किर्तीदा अजमेरा, अर्चना डेहनकर, दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंडळ अध्यक्ष संजय अवचट, किशोर पलांदूरकर, विनोद कन्हेरे, संजय चौधरी, देवेन दस्तुरे, किशोर वानखेडे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन