काटोल : राज्य शासनाकडून आधारभूत किंमत योजना अंतर्गत ज्वारी आणि मका खरेदी केंद्र तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातुन सुरु करण्यात आले आहे. या खरेदी केंद्राचा शुभारंभ काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासकीय दरानुसार मका १८५० रुपये तर ज्वारी २६५० रुपये या भावाने खरेदी केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनी शासकीय खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी विक्रीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मानकर यांनी केले. यावेळी बाजार समितीचे संचालक अजय लाडसे, माणिकराव लांडे, गणेश केला, खरेदी विक्री संस्थेचे संचालक दिनकर बावीस्कर, व्यवस्थापक खत्री, भीमराव पावडे, काकासाहेब साळवे, निरीक्षक अधिकारी कुंभारे व शेतकरी उपस्थित होते.
काटोल येथे शासकीय मका व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:27 AM