शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
2
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
3
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
4
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
5
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
6
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
7
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
8
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
9
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
10
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
11
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
12
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
14
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
15
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
16
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
17
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
19
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
20
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट

नागपुरात पोलिसांनी पकडला लाखो रुपयाचा शासकीय तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:07 AM

पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट्रक चालक व क्लिनरला अटक केल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देशासकीय धान्याचा काळाबाजार : ट्रक चालक व क्लिनरला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट्रक चालक व क्लिनरला अटक केल्याचे सांगितले जाते.पोलिसांना एम.एच./३५/३६५९ क्रमांकाच्या ट्रकद्वारे शासकीय धान्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाचे पीएसआय मनीष गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कापसी पुलाजवळ ट्रक रोखला. त्याची तपासणी केली असता त्यात तांदळाची पोती होती. पोलिसांनी ट्रक चालक अनिल गुडेकर आणि क्लिनर प्रल्हाद गुडेकर याला ताब्यात घेतले.मिळालेल्या माहितीनुसार कळमना नाका नंबर चारमधील गोदामातून ट्रकमध्ये तांदळाची पोती लोड करण्यात आली. यानंतर मौदा येथील सावली येथून सुद्धा तांदळाची पोती भरण्यात आली. तांदळाची ही पोती घेऊन गोंदियाला ट्रक जात होता. कापसी पुलाजवळ पोलिसांनी तो अडवला व तांदूळ जप्त केला.मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेला तांदूळ हा गोंदिया येथील सुनील अग्रवाल नावाच्या व्यापाºयाच्या गोदामात पोहोचवण्यात येणार होता. अग्रवाल अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे.जप्त करण्यात आलेला तांदूळ रेशनच्या दुकानात आणि शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वितरित करण्यात आला होता. काळाबाजारी करीत तो खासगी व्यापाऱ्या ला विकण्यात आला होता.या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यात मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. झोन पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांनी कारवाईबाबत दुजोरा दिला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची पोती मोजल्यानंतर आणि ड्रायव्हर व क्लिनरची विचारपूस केल्यावरच याबाबत स्पष्ट काही सांगता येईल, असे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस चालक व त्याच्या साथीदाराची विचारपूस करीत होते.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा