शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सुरक्षेचा जागर करण्यासाठी सरकार पोलिसांच्या पाठीशी

By admin | Published: February 20, 2016 3:24 AM

प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षणाचा मंत्र देण्याचे पोलिसांनी प्रयत्न करावे. सुरक्षेचा जागर करणाऱ्या पोलिसांना लागणारा निधी..

‘टेक एक्स्पो’चे उद्घाटन : पालकमंत्र्यांची घोषणानागपूर : प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षणाचा मंत्र देण्याचे पोलिसांनी प्रयत्न करावे. सुरक्षेचा जागर करणाऱ्या पोलिसांना लागणारा निधी प्रसंगी डीपीसीमधून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.शहर पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियममध्ये दोन दिवसीय ‘टेक एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी त्याचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. यावेळी मंचावर पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, रंजनकुमार शर्मा उपस्थित होते. प्रारंभी शिवजयंतीचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सायबर अवेअरनेस, क्राईम सीन, मॅनेजमेंट अ‍ॅन्ड इन्व्हेस्टीगेशन, तपासात न्यायसहायक विभागाची उपयुक्तता, पुरावे गोळा करण्याची पध्दत, इलेक्ट्रॉनिक अलार्म सिस्टिम, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही, अत्याधुनिक उपकरणांचा या प्रदर्शनात समावेश असून, व्यसनमुक्ती, रस्ता सुरक्षा, महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जनजागरण करणारे स्टॉलही या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. त्याबाबतची सचित्र माहिती पुस्तिका ‘तंत्रा टेक एक्स्पो-२०१६’चे प्रकाशन करण्यात आले. पालकमंत्री बावनकुळे यांनी त्याबाबत शहर पोलिसांचे भरभरून कौतुक केले. शनिवार २० फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क राहणार आहे. प्रदर्शनात आलेल्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन्सिक सायन्स, पर्सिस्टंट सिस्टिम, प्रियॉन्स फॉरेन्सिक टेक्नॉलॉजी, कॉप्सटेक सायबर फॉरेन्सिक लॅब पुणे, सायबर सेफ इंडिया (एनजीओ) पुणे, हायटेक टेक्नॉलॉजी मुंबई, ग्रीनलीफ टेक्नॉलॉजी नागपूर, रक्षक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तसेच पोलीस विभागातील फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट, आर्थिक गुन्हे विभाग, अमली पदार्थविरोधी पथक, सामाजिक सुरक्षा विभाग, वाहतूक विभाग, बिनतारी संदेश विभाग, पोलीस मुख्यालय तसेच सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांकडून विविध विषयांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. ई-शासन प्रणाली व माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलीसवाली सेल्फी प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘पोलीसवाली सेल्फी’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी, नागरिकांनी पोलिसांसोबत काढलेली छायाचित्रे शहर पोलीस दलाच्या फेसबुक पेजवर अपलोड करून लाईक करावी. सर्वोत्कृष्ट ‘सेल्फी’ला आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. मन की बातपोलिसांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा करतानाच पालकमंत्र्यांनी ‘तुमचे हे काम नागरिकांपर्यंत पोहचवा’, असा सल्ला दिला. त्यासाठी एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही बावनकुळे यांनी सुचविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा पोलिसांच्या कामगिरीवर खूष आहेत. त्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्यात मोठा अभिनेता सहभागी होऊ शकेल, असे सांगून पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या ‘मन की बात’ला हवा दिली.