शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

सरकारचे आर्थिक धोरण योग्य दिशेने  : अध्यक्ष सीए ललित बजाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 9:45 PM

President CA Lalit Bajaj, Government's economic policy, nagpur news कोरोना महामारीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून, ती रुळावर आणण्यासाठी सरकारने राबविलेली विविध धोरणे योग्य दिशेने आहेत.

ठळक मुद्दे नागपूर सीए संस्थेतर्फे ‘आयकर-जीएसटी’वर परिषद

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून, ती रुळावर आणण्यासाठी सरकारने राबविलेली विविध धोरणे योग्य दिशेने आहेत. उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. यावर्षी आयकर विभागाकडे जमा झालेल्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सने रेकॉर्ड केला आहे आणि जुलैनंतर जीएसटी कलेक्शनही वाढले आहे. हे अर्थव्यवस्था वाढीचे संकेत असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारताच्या विभागीय कौन्सिलचे (विर्क) अध्यक्ष सीए ललित बजाज यांनी येथे व्यक्त केले.

आयसीएआय विर्क आणि नागपूर सीए संस्थेतर्फे धंतोली येथील आयसीएआय भवनात आयकर-जीएसटी विषयावर आयोजित टॅक्स परिषदेसाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ललित बजाज म्हणाले, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी सरकार आणि कार्यालयीन स्तरावर सकारात्मक धोरणांचा अवलंब करण्यात येत आहे. त्या ठिकाणी सीए, व्यापारी आणि उद्योजकांचे म्हणणे ऐकण्यात येत आहे. सीए सरकारचे आर्थिक पॅकेज आणि धोरण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्याचे फायदे सांगण्यात यशस्वी ठरत आहेत. बजाज म्हणाले, कोरोना महामारीमुळे छोट्या उद्योगांना फायनान्सची अडचण निर्माण झाली होती. सीए सदस्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांमार्फत या अडचणी दूर केल्या. सोबतच सरकार आणि बँकांच्या योजना व्यापाऱ्यांना सांगितल्या. सरकारचे आर्थिक पॅकेज लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचले आहे. तसे पाहता छोटे व्यापारी अजूनही संकटात आहेत. कोरोना हेल्पलाईनद्वारे सीए इन्स्टिट्यूटने समाजसेवा केली आहे. पुढेही उपक्रम सुरू राहील. कोरोना काळात इन्स्टिट्यूटने सुरक्षितरीत्या परीक्षांचे यशस्वी आयोजन केले आहे.

पत्रपरिषदेत विर्कचे उपाध्यक्ष सीए विशाल दोशी, विर्क विकासा चेअरमन सीए अर्पित काबरा, रिजनल कौन्सिल सदस्य सीए अभिजित केळकर, आयसीएआय नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी, उपाध्यक्ष सीए साकेत बगडिया, सचिव सीए जितेन सागलानी, कोषाध्यक्ष सीए संजय अग्रवाल उपस्थित होते.

‘आयकर-जीएसटी’वर परिषद

आयसीएआय विर्कतर्फे आणि नागपूर चॅप्टरच्या सहकार्याने शनिवार धंतोली येथील कार्यालयात आयकर-जीएसटी विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. सीए आशिष मोदी आणि सीए राजीव जैन यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. सीए किरीट कल्याणी म्हणाले, सीए सदस्यांसाठी नागपूर सीए कनेक्ट नावाने मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन झाले आहे. कोरोना महामारीत समाजाची सेवा करणाऱ्या सीए कोरोना हेल्पलाईन समूहाचे सदस्य सीए सतीश सारडा, सीए अश्विनी अग्रवाल, सीए अजय वासवानी, सीए आशिष मुकीम, सीए जेठालाल रुखियानी, सीए नरेश जखोटिया, सीए जुल्फेश शाह, सीए सचिन जाजोदिया, सीए अमर अग्रवाल, सीए नीलेश तोष्णीवाल यांचा सत्कार आणि सीए ललित बजाज यांच्या हस्ते अ‍ॅडमिन ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :chartered accountantसीएGSTजीएसटी