शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन देण्यास सरकारची नाहरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 7:41 PM

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी जीगर प्रवीण ठक्कर याने आत्महत्या केल्यामुळे इतर आरोपींना सशर्त जामीन देण्यास राज्य सरकारने हरकत घेतली नाही. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेता सात आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला.

ठळक मुद्देहायकोर्टात जामीन मंजूर : पासपोर्ट जमा करण्याचा आरोपींना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी जीगर प्रवीण ठक्कर याने आत्महत्या केल्यामुळे इतर आरोपींना सशर्त जामीन देण्यास राज्य सरकारने हरकत घेतली नाही. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेता सात आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सोमवारी हा निर्णय दिला.आरोपींमध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या संयुक्त उपक्रम कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, मुखत्यारपत्रधारक रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे यांचा समावेश आहे. जीगरही कंपनीचा भागीदार होता. कंपनीतील आरोपींना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा जात मुचलका व तेवढ्याच रकमेचे सक्षम जामीनदार तर, जिभकाटेला एक लाख रुपयांचा जात मुचलका व तेवढ्याच रकमेचा सक्षम जामीनदार सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, सर्वांना पुराव्यांशी छेडछाड न करण्याचा व एक आठवड्यात पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात आरोपींविरुद्ध ४५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींवर फसवणूक करणे (भादंवि कलम ४२०), फसवणुकीच्या उद्देशाने संगनमत करणे (भादंवि कलम ४६८), बनावट कागदपत्रे खरे भासवून वापरणे (भादंवि कलम ४७१), कट रचणे (भादंवि कलम १२०-ब), सरकारी अधिकाऱ्याने फौजदारी गुन्हा करणे [लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१)(क)(ड)] हे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, अ‍ॅड. आर. एस. सुंदरम, अ‍ॅड. उषा तन्ना, अ‍ॅड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार