आॅनलाईन लोकमतनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. याचा विचार करता ८०५६ सफाई कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जीओ फेन्सिंग ट्रेकिंग यंत्रणेचा वापर केला जाणार असून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जीपीआरएस व जीपीएस अशा दोन्ही प्रणालीवर चालणारे घड्याळ दिले जाणार आहे. सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.या घड्याळीमुळे सफाई कर्मचारी किती वाजता कामावर आला, त्याने किती तास काम केले याची माहिती उपलब्ध होणार असल्याने शहर स्वच्छ होण्याला मदत होणार होईल. आरोग्य विभागात ३ हजार ५९६ नियमित सफाई कर्मचारी आहेत तर ४ हजार ४६० ऐवजदार अर्थात कंत्राटी सफाई कामगार आहेत़ या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० ते ९०० मिटर रस्त्याचे ५ हजार ९६ बिट्स नेमून देण्यात आले आहेत. मात्र अनेक कर्मचारी विनापरवानगी सुटीवर जातात, पूर्णवेळ काम करीत नाही. कामावर वेळेवर येत नाही. अशा नागरिकांच्या व नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. या प्रकल्पावर वर्षाला २ कोटी २४ लाख रुपये खर्च होतील. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाच्या आयटीआय या कंपनीने याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत या उपक्रमासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. सफाई कामगार व ऐवजदार यांच्या वेतनावर वर्षाला १६८ कोटी खर्च होतात. याचा विचार करता जीपीआरएस व जीपीएस घड्याळी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या यंत्रणेमुळे एकाचवेळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. कर्मचारी किती वाजता कामावर आला, त्याने किती वेळ काम केले आदीची नोंद होईल़ संबंधित कर्मचाऱ्याने त्या यंत्रात हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची नोंद कंट्रोल रुममध्ये होईल़ शिवाय एखादा कर्मचारी अचानक आजारी पडून नाडीचे ठोके वाढल्यास याबाबत कंट्रोल रुमला अलर्ट येईल़
उपराजधानीतील आठ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार जीपीएस ट्रॅकर रिस्टवॉचेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 8:32 PM
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. याचा विचार करता ८०५६ सफाई कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी जीओ फेन्सिंग ट्रेकिंग यंत्रणेचा वापर केला जाणार असून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जीपीआरएस व जीपीएस अशा दोन्ही प्रणालीवर चालणारे घड्याळ दिले जाणार आहे.
ठळक मुद्देस्थायी समितीने दिली मंजुरीशहरातील स्वच्छतेवर राहणार आता मिनिट टू मिनिट ‘वॉच’डॉक्टर व शिक्षकांनाही घड्याळे देण्याची सूचना