शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ढगाआडही मृत्यूचे उदासभान शोधत असतील ग्रेस!

By admin | Published: March 26, 2017 1:56 AM

२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले.

आज स्मृतिदिनशफी पठाण नागपूर२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले. शब्दाच्या मायेने हळव्या झालेल्या खडकाच्याही डोळ्यात पाणी उभे करणाऱ्या त्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्वभावानुसार मृत्यूलाही धाप लागेपर्यंत झुंजविल्यानंतर स्वत:च त्याच्या हवाली होताना आता अंतर्मनाला अस्वस्थ करणारी शब्दकळा आपल्याला छळणार नाही, असा ग्रेसांचा समज झाला असेल तर तो निव्वळ भ्रम आहे ‘मृगजळाच्या बांधकामा’सारखा. याला कारण, ग्रेस आणि शब्दांचे नातेच मुळी खोल आहे प्राचीन नदीसारखे. अन् ते असे क्षणिक तृप्ततेला भुलून आपला प्रवाह बदलणे शक्यच नाही. म्हणूनच ग्रेस आजही जिवंत आहेत एक दंतकथा बनून. अंतर्मनाच्या उत्खननातून हाती सलग येत राहिलेले अनंत अवशेष शब्दांच्या सर्वांगात पेरून हा औलिया वाजवत राहिला खिन्नतेची बासरी. अगदी समोर मृत्यू उभा असतानाही. अखेर ग्रेसांनाच मृत्यूची दया आली आणि ते निघाले त्याच्यासह अनंताच्या प्रवासाला. आपल्याला मृत्यूचे उदासभान शोधायचे आहे आणि ते ढगाआड गेल्याशिवाय शोधता येणार नाही, असेच कदाचित गे्रसांना वाटले असेल. नेमके काय झाले माहीत नाही, पण २६ मार्च २०१२ रोजी ग्रेसनामक कवितेच्या या प्रज्वलित दीपांजलीवर काळाने त्याच्या धर्मकर्तव्यानुसार फुंकर घातली आणि लौकिकार्थाने ती विझली. लोक म्हणाले, गेस गेले. पण, या म्हणण्याला खरे कसे मानावे? कारण, आजही जेव्हा कुणी ‘मितवा’ची पाने उलटतो, ‘चर्चबेल’च्या शब्दांना ओंजळीत धरतो, ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशा’त शतपावली करतो, ‘ओल्या वाळूंच्या बासरी’ला ओठाशी धरतो...तेव्हा प्रत्येक वेळेस ग्रेस नावाचे हे अविट गाणे वाचकांच्या मनात फेर धरत असते सांध्यपर्वतावरील असंख्य वैष्णवांसह. दूर वाऱ्याने हलणाऱ्या धुक्यांच्या खोल तळाशी एक दुर्बोध शिल्प दिसत असते काहीशे अस्पष्ट. ते ग्रेसच असतात.सांजभयाने अस्वस्थ झालेल्या वाचकाला आपल्या सनातन शब्दसामर्थ्याने आश्वस्त करण्यासाठी व अंतर्मुखता, आत्ममग्नता आणि आत्मप्रीतीचे आरोप झेलणाऱ्या आपल्या कवितेला सहनशीलतेची रसद पुरवण्यासाठी ग्रेसांची पडछाया अशी डोकावत असते पुस्तकांच्या पानापानातून. मग कसे म्हणायचे ग्रेस गेले? आजही धंतोलीच्या वीणा विहारमधून अननसाचा रस पिऊन, खांद्यावर शबनम बॅग लटकवून अंबाझरी मार्गावरील स्वीमिंग टँककडे झेपावणारी पावले ग्रेसांचीच आहेत, असा भास होतो तेव्हा मन पुन्हा विचारते, मग कसे म्हणायचे ग्रेस गेले?